शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

अवैध ले-आऊटवर नासुप्रचा दणका

By admin | Updated: February 22, 2015 02:36 IST

नासुप्रची कुठलीही मंजुरी न घेता मेट्रोरिजनच्या नावावर अवैधरीत्या ले-आऊट टाकून भूखंड विक्री करणाऱ्यांना नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी जोरदार दणका दिला आहे.

नागपूर : नासुप्रची कुठलीही मंजुरी न घेता मेट्रोरिजनच्या नावावर अवैधरीत्या ले-आऊट टाकून भूखंड विक्री करणाऱ्यांना नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी जोरदार दणका दिला आहे. न्यू प्रॉस्परिटी लॅण्ड डेव्हलपर्स अ‍ॅण्ड बिल्डर्सने मौजा जामठा परिसरातील खसरा क्रमांक २७/१ वर टाकलेल्या अवैध ले-आऊटवर नासुप्रने शुक्रवारी कारवाई केली. डेव्हलपर्सने मार्किंग करून गाडलेले खांब जेसीबीच्या साहाय्याने उखडून फेकण्यात आले. याशिवाय डेव्हलपर्सला ताकीदही देण्यात आली आहे.मेट्रोरिजनच्या नावावर अनधिकृत ले-आऊटमधील भूखंड विक्रीचा गोरखधंदा जोरात सुरू असल्याचा खुलासा लोकमतने ‘मेट्रोरिजनचे गोलमाल’ या वृत्तमालिकेंतर्गत केला. मेट्रोरिजनच्या नावावर नासुप्रची परवानगी न घेता, डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट न करता ले-आऊट टाकून मोठ्या प्रमाणात भूखंडांची विक्री केली जात आहे. नागरिकांना मेट्रोरिजनचे स्वप्न दाखवून भविष्यातील फायद्यासाठी भूखंड खरेदी करण्याचे प्रलोभन दिले जात असून या प्रलोभनाला बळी पडून नागरिक अनधिकृत भूखंड खरेदी करीत आहे. ही वास्तविकता लोकमतने मांडली व नागरिकांनी मेट्रोरिजनमधील भूखंड खरेदी करण्यापूर्वी कोणकोणती कागदपत्रे पहावी, याबाबत मार्गदर्शनही केले. लोकमतच्या या वृत्तमालेची नागरिकांनी तर दखल घेतलीच पण नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनीही गंभीर दखल घेतली व अशा अनधिकृत ले-आऊटवर कारवाई करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना दिले. लोकमतच्या वृत्तानंतर नागपूर ग्रामीण तहसील परिसरात मौजा जामठा अंतर्गत खसरा क्रमांक २७/१ वर न्यू प्रॉस्परिटी लॅण्ड डेव्हलपर्स अ‍ॅण्ड बिल्डर्सने अनधिकृत ले-आऊट टाकल्याची तक्रार नासुप्रकडे आली. डेव्हलपर्सने सुमारे तीन एकरवर अनधिकृत ले-आऊट टाकले असून प्लॉटचे मार्किंग करून खांबही गाडले होते. ले-आऊटची माहिती देणारे फलकही लावले होते. संबंधित जमीन पूर्वी मिहानमध्ये नोटिफाईड होती. आता ती डीनोटिफाईड झाली आहे. या तक्रारीची दखल घेत विभागीय अधिकारी पंकज पाटील यांनी संबंधित डेव्हलपर्सच्या नावे कारणे दाखवा नोटीस बजावली व काम थांबविण्याचे निर्देश दिले. डेव्हलहपर्सचे व्यवस्थापकीय संचालक घनश्याम नंदनवार व पडोळे हे आहेत. नोटिसीनंतरही काम थांबविण्यात आले नाही. त्यामुळे शुक्रवारी नासुप्रच्या पथकाने कारवाई केली. जेसीबीच्या साहाय्याने सर्व खांब हटविण्यात आले. लावलेले फ्लेक्स जप्त केले. कारवाईचा धसका घेत डेव्हलपर्सने नासुप्रकडे परवानगीसाठी रीतसर अर्ज करण्याची हमी दिली आहे. (प्रतिनिधी)अवैध ले-आऊट विक्रेत्यांचे धाबे दणाणलेनासुप्रची परवानगी न घेता अवैधरीत्या ले-आऊट टाकून नागरिकांना भूखंड विकले जात असल्याचा खुलासा लोकमतने ‘मेट्रोरिजनचे गोलमाल’ या वृत्तमालिकेंतर्गत केला. यामुळे नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली असून नागरिक डेव्हलपर्स न नासुप्रकडे चौकशी करू लागले आहेत. नासुप्रनेही दखल घेत पहिलीच धडाकेबाज कारवाई केल्यामुळे अवैध ले-आऊट टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.