आता ‘नो रिंग’, फक्त ‘ई-टेंडरिंग’

By Admin | Updated: May 13, 2014 00:57 IST2014-05-13T00:57:45+5:302014-05-13T00:57:45+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणार्‍या कंत्राट प्रणालीसाठी आता ‘ई-टेंडरिंग’चा उपयोग करण्यात येणार

Now 'no ring', only 'e-tendering' | आता ‘नो रिंग’, फक्त ‘ई-टेंडरिंग’

आता ‘नो रिंग’, फक्त ‘ई-टेंडरिंग’

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणार्‍या कंत्राट प्रणालीसाठी आता

विद्यापीठाचा पसारा फार मोठा असल्यामुळे निरनिराळ्या कामांसाठी दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर कंत्राट प्रक्रिया राबवली जाते. यात प्रिंटिंग, कॅटरिंग, तांत्रिक बाबी, संगणक इत्यादी प्रकारच्या बाबींसाठी निविदा मागविण्यात येतात. परंतु अनेकदा काही ठराविक कंत्राटदारांनाच कंत्राट देण्यात येत असल्याचे आरोप होत होते. बहुतांश आरोपांमध्ये तथ्य नसले तरी यामुळे विद्यापीठाचे नाव नाहक खराब होत होते.

राज्यातील विद्यापीठांनी जास्तीतजास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश राज्यपाल तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले होते; शिवाय कंत्राट पद्धत पारदर्शक करण्याची मागणीदेखील समोर येत होती. या बाबी लक्षात घेऊन विद्यापीठात यावर अनेक दिवसांपासून मंथन सुरू होते. अखेर प्रभारी कुलगुरू अनुप कुमार यांनी

आता नवीन प्रक्रियेनुसार निविदा ऑनलाईन मागविण्यात येणार आहेत. शिवाय

ई-टेंडरिंगचा उपयोग करण्यात येणार आहे. कंत्राट प्रणाली पारदर्शक राहावी व कुठल्याही व्यवहारात गैरप्रकार होऊ नयेत यासाठी ही पद्धत वापरण्यात येणार आहे. याअंतर्गत ऑनलाईनपद्धतीने देशपातळीहून निविदा सादर करता येणार आहेत. सोबतच केवळ फोनवरुन रिंगकरून कामे पदरात पाडू घेण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.ई-टेंडरिंगच्या पद्धतीला हिरवी झेंडी दाखवली. ऑनलाईनप्रणाली असल्यामुळे कुलगुरूंसह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकार्‍यांना यावर लक्ष ठेवता येणार आहे. या पद्घतीमुळे निविदांमधील गैरप्रकार दूर होण्यास मदत होईल. या ई-टेंडरिंगमुळे निविदांच्या कामात पारदर्शकता येणार आहे; शिवाय अनेक कंत्राटदारांची मोनोपलीसंपुष्टात येईल. देशस्तरावरील कुठलाही कंत्राटदार निविदा सादर करू शकणार आहे. यात वेळेची बचत तर होणार आहेच, पण त्याबरोबर कार्यक्षमताही वाढणार आहे. विशेष म्हणजे या कामाचे उत्तरदायित्वही निश्‍चित होणार असल्याची माहिती विद्यापीठातील अधिकार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Now 'no ring', only 'e-tendering'