शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

...आता श्वासातूनच होणार मधुमेह तपासणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:16 IST

Health Update: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी श्वासाच्या माध्यमातून मधुमेह तपासणी करणारे अत्याधुनिक उपकरण विकसित केले आहे. त्यामुळे रक्त काढण्यासाठी सुई टोचण्याची भीती आता इतिहासजमा होणार आहे.

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी श्वासाच्या माध्यमातून मधुमेह तपासणी करणारे अत्याधुनिक उपकरण विकसित केले आहे. त्यामुळे रक्त काढण्यासाठी सुई टोचण्याची भीती आता इतिहासजमा होणार आहे. या ‘नॉन-इनवेसिव्ह डायबिटिस मॉनिटरिंग डिवाइस’ला यूके डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे.मधुमेह तपासणीत पारंपरिक पद्धतीत सुईद्वारे रक्ताचे नमुने घेण्याची प्रक्रिया रुग्णांसाठी त्रासदायक ठरते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागातील संशोधकांनी नावीन्यपूर्ण पर्याय विकसित केला आहे.

काय आहे संशोधन? संशोधकांनी तयार केलेल्या ‘नॉन-इनवेसिव्ह डायबिटिस मॉनिटरिंग डिवाइस’च्या साहाय्याने आता श्वासाचे विश्लेषण करून रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण मोजता येणार आहे.  उपकरणाची अचूकता आणि व्यावहारिक उपयोगिता अधिक वाढवण्यासाठी कॅलिब्रेशन आणि व्हॅलिडेशन प्रक्रिया सुरू आहे. येत्या काळात हे उपकरण सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल.

कुणी केले संशोधन?या प्रकल्पात पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वर्षा धुर्वे, हर्ष तिवारी आणि सबरीन बानो मोहम्मद जावेद मन्सुरी यांचे प्रमुख योगदान आहे. याशिवाय बालाघाट येथील शासकीय जेएसटीपीजी महाविद्यालयाचे डॉ. दुर्गेश आगासे, नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. रश्मी दिलीप उरकुडे, डॉ. अंकित काळे, बालाघाट येथील शासकीय कमला नेहरू महिला महाविद्यालयाच्या डॉ. तनुश्री आगासे, इरा दिलीप उरकुडे (ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन, आयर्लंड) यांचेही योगदान आहे.या प्रकल्पातून आंतरसंस्थात्मक तसेच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे. 

या उपकरणाची संकल्पना ‘आविष्कार संशोधन महोत्सव २०२४’मध्ये सादर करण्यात आली होती. हर्ष तिवारी यांच्या प्रकल्पाला पुरस्कारही मिळाला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Breath Test Revolution: Diabetes Detection Without Needles Now Possible!

Web Summary : Nagpur researchers developed a breath-based diabetes test, eliminating the need for blood samples. This non-invasive device analyzes breath to measure glucose levels. Calibration is underway, promising wider accessibility soon. The project involved inter-institutional and international collaboration, showcasing innovation in diabetes monitoring.
टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्य