शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

आता मुख्यमंत्र्यांनीच न्याय द्यावा

By admin | Updated: January 17, 2017 01:50 IST

आधुनिक भारतातील राष्ट्रपुरुष व ‘जगाला प्रेम अर्पावे’ अशी शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचा राज्य शासनाला पडलेला विसर अनुयायांच्या जिव्हारी लागला आहे.

अनुयायींची अपेक्षा : तुकडोजी महाराज, गाडगेबाबांचा शासनाला विसर पडल्याबाबत व्यक्त केली नाराजीनागपूर : आधुनिक भारतातील राष्ट्रपुरुष व ‘जगाला प्रेम अर्पावे’ अशी शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचा राज्य शासनाला पडलेला विसर अनुयायांच्या जिव्हारी लागला आहे. या दोन्ही संतांनी आयुष्यभर समाजसुधारक विचारांची शिदोरी वाटली. त्यांचे विचारधन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी शासनाने थोर पुरुषांच्या यादीतूनच त्यांचे नाव वगळल्याबाबत समाजाच्या विविध स्तरांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यासंबंधात पुढाकार घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.राज्यातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांत राष्ट्रीय सणांसोबतच वर्षभर राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करण्यात येते. यासंदर्भात राज्य शासनाकडून दरवर्षी परिपत्रक काढण्यात येते. २०१७ सालाच्या यादीमध्ये तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा दोघांचेही नाव नाही. अशा स्थितीत विद्यापीठांमध्ये या दोन्ही संतांच्या विचारांचा जागर कसा होणार, असा प्रश्न ‘लोकमत’ने उपस्थित केला होता. राज्य शासनाच्या या धोरणावर समाजातील विविध स्तरांतून नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)शासनाने मानसिकता बदलावीराष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा या दोघांचेही कार्य तळागाळात रुजले आहे. नवीन पिढीपर्यंत ते काम पोहोचायलाच हवे. मात्र शासनाच्या यादीतच त्यांचे नाव नसणे ही दुर्दैवी बाब आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी सर्वात अगोदर तर आपली मानसिकता बदलायला हवी. मुख्यमंत्री, वित्तमंत्री विदर्भातीलच आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन या दोन्ही राष्ट्रपुरुषांचे कार्य राज्यातील सर्व विद्यापीठांत पोहोचावे यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केली.नाव झाले, कार्य कधी पोहोचणार ?नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आले आहे. नाव तर देऊन झाले, आता त्यांचे कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील थोर पुरुषांच्या यादीत या दोघा राष्ट्रपुरुषांचे नाव नाही ही धक्कादायक बाब आहे. शासन त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यायचा तेव्हा घेईल, मात्र आम्ही अध्यासनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे विचार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले.अत्यंत वेदनादायी बाबराष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर समाजप्रबोधनाचे कार्य केले. कधी कुणामध्ये भेदभाव केला नाही. मात्र शासनाने त्यांच्यासोबत भेदभाव केला. हे पाहून अत्यंत वेदना झाल्या. हे दोघेही राष्ट्रीय महात्मे आहेत. त्यांच्या जयंतीचे सर्व विद्यापीठांत कार्यक्रम झालेच पाहिजेत. शासनाने अप्रत्यक्षपणे या दोघाही महापुरुषांचा अपमानच केला आहे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सहकारी व ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन भिसेकर यांनी व्यक्त केले.