शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आता विधानसभानिहाय समाधान शिबिर

By admin | Updated: May 31, 2015 02:38 IST

प्रशासन आणि जनता यामधील सेतूचं काम समाधान शिबिर करील. यापुढे नागपूर शहर व जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात हा उपक्रम राबविण्यात येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : शिबिर म्हणजे प्रशासन व जनतेमधील ‘सेतू’नागपूर : प्रशासन आणि जनता यामधील सेतूचं काम समाधान शिबिर करील. यापुढे नागपूर शहर व जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात हा उपक्रम राबविण्यात येईल. जेणेकरून जनतेला न्याय मिळेल. यापुढे कालमर्यादेत काम पूर्ण करण्याची हमी देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिले. मुख्यमंत्री प्रतिनिधित्व करीत असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी समाधान शिबिराच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन मुंडले हायस्कूल येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. महापौर प्रवीण दटके, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, पक्षनेते दयानंद तिवारी, आ. सुधाकर देशमुख, आ.प्रा. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. समीर मेघे, आ. विकास कुंभारे, आ.डॉ. मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनुप कुमार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पालक सचिव प्रवीण दराडे, पोलीस आयुक्त एस.पी. यादव, अप्पर आदिवासी आयुक्त माधवी खोडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, दैनंदिन गरजांसाठी लागणारी कागदपत्रे वेळीच उपलब्ध करून द्यावी. केवळ शिबिरातच नव्हे तर रोजच्या रोज कालमर्यादेत प्रशासनाने काम पूर्ण केले पाहिजे. समाधान शिबिर हे जनता आणि प्रशासनामधील दुवा आहे. यापुढे हे उपक्रम जनता आणि प्रशासन या दोघांमध्ये सेतूचे काम करणार आहे. यानिमित्ताने लोकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. हैदराबाद हाऊस येथील मुख्यमंत्री सचिवालय आपण सुरू केले असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. लोकांना वेळेत सेवा मिळाली पाहिजे, या हेतूने सेवा हमी विधेयक राज्य शासनाने आणले आहे. या विधेयकामध्ये १५० सेवांचा अंतर्भाव केला असला तरी भविष्यात सर्व सेवा समाविष्ट करण्याचा मानस असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कायदा केल्यानंतर कोणीही त्यात कुचराई करता कामा नये. जनतेच्या तक्रारी व समस्यांना प्रशासन आणि शासन जबाबदार असणार आहे. प्रशासनात गतिमानता आणल्याशिवाय लोकांची कामे तातडीने होणार नाही. त्यासाठी संगणकीकरणाचा उपयोग कामकाजात आणला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)