शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

तुली पब्लिक स्कुलला आदिवासी विभागाची नोटीस

By admin | Updated: January 7, 2017 22:21 IST

शाळेतील मुलीच्या शोषणप्रकरणी आदिवासी विकास विभागातर्फे तुली पब्लिक स्कुलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आ

ऑनलाइन लोकमत
 नागपूर, दि. ७ -  शाळेतील मुलीच्या शोषणप्रकरणी आदिवासी विकास विभागातर्फे तुली पब्लिक स्कुलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त एस. डब्ल्यु. सावरकर यांनी दिली.
  या संदर्भात पत्रकाद्वारे त्यांनी कळविले आहे की, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेअंर्तगत पीडीत मुलगी ही तुली पब्लिक स्कुल, बोकारा, कोराडी रोड, नागपूर या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे.  तुली पब्लिक स्कुल, बोकारा, कोराडी रोड, नागपूर येथे प्रकल्प अधिकारी, नागपूर तसेच शाळेचे पालक सचिव तथा कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डी. बी. पगाडे व तीन महिला कनिष्ठ शिक्षण विकास अधिकारी यांच्या पथकाने ४ जानेवारी रोजी भेट दिली. या भेटीच्या वेळी विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान सहा विद्यार्थिनींनी त्यांच्या जबाबात तेथील माजी कर्मचा-याच्या वर्तणुकीविरुध्द तक्रार केली आहे. त्याप्रमाणे या घटनेबाबत संस्थेने या कार्यालयास वेळीच अवगत करुन न देता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या सबबीखाली त्यांच्याविरुध्द कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
या संदर्भात आज अप्पर आयुक्त, आदिवासी विकास नागपूर यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट दिली. कोराडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पठाण, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नयन कांबळे, कनिष्ठ शिक्षण अधिकारी डी. बी. पगाडे , अंबादे, आर.टी. आय. अ‍ॅक्शन कमेटीचे शहीद शरीफ, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत आणि तुली व्यवस्थापन यांच्या समक्ष चर्चा करण्यात आली.
 
 संबंधित मुलींना बाल न्यायालयासमोर सादर करणार
पीडित मुलींना संरक्षणाची गरज असल्यामुळे आणि घटनेची सत्यता पडताळण्यासाठी बाल कल्याण समिती (बाल न्यायालय) यांच्यासमक्ष त्यांचा जबाब नोंदविण्याची गरज आहे. त्यानंतर बाल न्यायालयासमोर पुढील आठवड्यात संबंधित मुलींना उपस्थित करण्याबाबत प्रकल्प अधिकारी नागपूर यांनी आदेश दिले आहेत.