शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीन डॉक्टरांसह नऊ ‘लेट लतिफां’ंना नोटीस

By admin | Updated: May 14, 2016 02:54 IST

रुग्णसेवेत वेळेला खूप महत्त्व आहे. परंतु काही डॉक्टरांसह तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना याचे काही देणे-घेणे नसल्याचा प्रकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी दिसून आला.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : नोंदणी कक्षापासून ते रक्तपेढीत कर्मचारी गैरहजरनागपूर : रुग्णसेवेत वेळेला खूप महत्त्व आहे. परंतु काही डॉक्टरांसह तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना याचे काही देणे-घेणे नसल्याचा प्रकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी दिसून आला. ‘लेट लतिफ’ असलेल्या तीन वरिष्ठ डॉक्टरांसह तीन तंत्रज्ञ, एक फार्मसिस्ट व दोन चतुर्थ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या हॉस्पिटलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडल्याचे बोलले जात आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १ अशी आहे. रुग्ण सकाळी ७.३० वाजतापासून गर्दी करतात. परंतु नोंदणी कक्षापासून ते रक्तपेढी, प्रयोगशाळा, विविध विभाग या वेळेत सुरू होत नसल्याच्या तक्रारी आहेत. याची दखल हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी शुक्रवारी घेतली. सकाळी ९ वाजता त्यांनी हॉस्पिटलचा राऊंड घेतला. नोंदणी कक्षासमोर २० रुग्ण रांगेत उभे होते. परंतु येथील कर्मचारी गायब होता. मधुमेहाची चाचणी पाणीही न पिता करावी लागते. यामुळे रुग्ण सकाळपासून येतात. परंतु ९ वाजून २० मिनिटे होऊनही रक्त संकलन केंद्रात विभाग प्रमुखांसह तंत्रज्ञचा पत्ता नव्हता. ९.३० वाजले असतानाही रक्तपेढीला कुलूप ठोकले होते. आठवड्यातून केवळ दोन दिवस नेफ्रालॉजी विभागाची ओपीडी असते. शुक्रवारी या विभागासमोर डायलिसीस व इतर रुग्णांची रांग लागली होती. परंतु या विभागाच्या विभाग प्रमुख आल्या ९.४० वाजता. औषधे वितरित करणारी खिडकीही बंद होती. यातच दोन चतुर्थ कर्मचारीही कामावर हजर नव्हते. याची गंभीर दखल डॉ. श्रीगिरीवार यांनी घेतली. (प्रतिनिधी)यांना बजावली कारणे दाखवा नोटीसशुक्रवारी उशिरा पोहचलेल्या रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. अनिता देशमुख, बायोकेमेस्ट्री विभागाचे प्रमुख डॉ. संजय सोनुने, नेफ्रालॉजी विभागाचे प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, तंत्रज्ञ कांचन उपासने, स्वाती अग्रवाल, अंजली अरोरा, फार्मसिस्ट लालवानी, चतुर्थ कर्मचारी येठे व खरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.