शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
4
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
5
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
6
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
7
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
8
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
9
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
10
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
11
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
12
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
13
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
14
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
15
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
16
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
17
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
18
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
19
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
20
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
Daily Top 2Weekly Top 5

५४ पदविका महाविद्यालयांना नोटीस

By admin | Updated: May 12, 2014 00:56 IST

नागपूर नियमांना धाब्यावर ठेवून पदविका अभ्यासक्रम संचालित करणार्‍या महाविद्यालयांना ‘एमएसबीटीई’ने( महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशन) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

‘एमएसबीटीई’ची कारवाई : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उचलले पाऊल

आशीष दुबे - नागपूर नियमांना धाब्यावर ठेवून पदविका अभ्यासक्रम संचालित करणार्‍या महाविद्यालयांना ‘एमएसबीटीई’ने( महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशन) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यातील ९२ महाविद्यालयांना नोटीस जारी करण्यात आली असून नागपूर विभागातील ५४ महाविद्यालयांचा यात समावेश आहे. जर या महाविद्यालयांनी निर्धारित वेळेत नोटिसीला उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर बंदीची कुºहाड कोसळण्याची शक्यता आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विभागातील ३४ तंत्रनिकेतन व औषधविज्ञानशास्त्र तसेच राज्य शासन व ‘एमएसबीईटी’द्वारे मान्यताप्राप्त २२ संस्थांचा समावेश आहे. ‘एमएसबीटीई’ने फेब्रुवारी व मार्च महिन्यात राज्यातील सर्व ‘एआयसीटीई’द्वारा (आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन)मान्यताप्राप्त पदविका महाविद्यालयांचे निरीक्षण केले होते. सोबतच राज्य शासन व ‘एमएसबीटीई’द्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालयांत निरीक्षण पथक पाठविण्यात आले होते. चौकशीनंतर निरीक्षण दलाने राज्यातील ९२ महाविद्यालयांची यादी तयार केली होती. या महाविद्यालयांत नियमांचे पालन होत नसल्याचे नमूद करण्यात आले होते. यानंतर या महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. यासंदर्भात महाविद्यालयांना लवकरात लवकर त्रुटीपूर्तता अहवाल सादर करावा लागणार आहे. ‘एमएसबीटीई’चे उपसचिव आर.व्ही.येनकर यांनी या वृत्ताला होकार दिला आहे. जर महाविद्यालय ठराविक वेळेत त्रुटीपूर्तता अहवाल देण्यास अपयशी झाले तर त्यांना बंद करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. ज्या महाविद्यालयांना नोटीस बजाविण्यात आली आहे तेथे निरीक्षण पथकांना अनेक त्रुटी आढळल्या होत्या. महाविद्यालयांत पुरेसे शिक्षक नव्हते तर अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव होता. ‘एआयसीटीई’, ‘एमएसबीटीई’ व राज्य शासनाच्या मापदंडानुसार महाविद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण होत नव्हता.