शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अपारंपरिक ऊर्जेतून होणार १४,४०० मे.वँ. वीजनिर्मिती

By admin | Updated: June 11, 2015 02:54 IST

अलीकडे अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून (नवीन व नवीकरणीय) वीजनिर्मितीचे फार महत्त्व वाढले आहे.

नवीन अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर : पुढील पाच वर्षांसाठी ‘प्लान’ नागपूर : अलीकडे अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून (नवीन व नवीकरणीय) वीजनिर्मितीचे फार महत्त्व वाढले आहे. केंद्र शासनाने या माध्यमातून पुढील २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट वीजनिर्मितीचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. यात १०० गिगावॅट सौर ऊर्जानिर्मितीचा समावेश असून त्यादृष्टीने देशभरात नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून वीजनिर्मितीचे कार्यक्रम हाती घेतले जात आहे. याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने नवे अपारंपरिक ऊर्जा धोरण मंजूर केले असून या अंतर्गत पुढील पाच वर्षांत राज्यात १४,४०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेत संबंधित धोरण मंजूर केले असून येत्या काळात याची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात अपारंपरिक ऊर्जा स्रोत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. यात पवन व सौर ऊर्जेसह उसाची चिपाडे, कृ षिजन्य टाकाऊ पदार्थ, सेंद्रीय टाकाऊ पदार्थ, वैद्यकीय टाकाऊ पदार्थ, खनिजजन्य व इतर टाकाऊ पदार्थांसह औद्योगिक टाकाऊ पदार्थांसारख्या स्रोतांपासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. या सर्व पारेषण संलग्न प्रकल्पांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने एकत्रित धोरण जाहीर केले आहे. नवीन धोरणानुसार राज्यात पारेषण संलग्न ५००० मेगावॅट क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प, १००० मेगावॅट क्षमतेचे उसाचे चिपाड व कृ षी अवशेषांवर आधारित सह-वीज प्रकल्प, ४०० मेगावॅट क्षमतेचे लघु जल विद्युत प्रकल्प, ३०० मेगावॅट क्षमतेचे कृषिजन्य अवशेषांवर आधारित प्रकल्प, २०० मेगावॅट क्षमतेचे औद्योगिक टाकाऊ पदार्थांपासून वीजनिर्मिती प्रकल्प आणि ७,५०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प अशा एकूण १४,४०० मेगावॅट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून वीजनिर्मिती प्रकल्पांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)