शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोराडीच्या विकासासाठी नासुप्र नोडल एजन्सी

By admin | Updated: May 28, 2015 02:27 IST

कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान या तीर्थस्थळाच्या विकास आराखड्याची आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने नासुप्रला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे.

नागपूर : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान या तीर्थस्थळाच्या विकास आराखड्याची आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने नासुप्रला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. याशिवाय या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शिखर समिती तर जिल्हास्तरावर या विकास कामांच्या अंमलबजावणीवर संनियंत्रण ठेवण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.कोराडी तीर्थक्षेत्र आराखड्यास अंतिम मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये वित्त व नियोजन मंत्री (उपाध्यक्ष) तर सदस्य म्हणून पाल्कमंत्री, वित्त व नियोजन राज्यमंत्री, रामटेकचे खासदार, विधानसभा सदस्य, नासुप्र सभापती, नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव (वित्त), आराखड्याशी संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, नागपूर रेल्वे परिक्षेत्राचे महाव्यवस्थापक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचा समावेश आहे. नगर विकास विभागाचे सचिव हे समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. ही शिखर समिती नियोजित आराखडा व त्यासाठी लागणाऱ्या खर्चास मंजुरी देईल. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी वेळोवेळी आढावा घेईल. याशिवाय जिल्हास्तरावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय संनियंत्रण समिती नेमण्यात आली आहे. नासुप्रने तयार केलेल्या विकास आराखड्याची छाननी करून तो अंतिम मंजुरीसाठी शिखर समितीकडे सादर करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय समितीवर असेल. विकास आराखड्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या विकासकामांचा वेळोवेळी आढावा घेणे, सर्व संबंधित प्रशासकीय विभाग, केंद्र शासनाचे प्रशासकीय विभाग यांच्याशी समन्वय साधून कामाच्या प्रगतीत येणाच्या अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या समितीची असेल. (प्रतिनिधी)