शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

कर विभागाला ना उरला कुणाचा डर !

By admin | Updated: November 26, 2014 01:02 IST

कर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईपुढे स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर हतबल झाले आहेत. बोरकर यांनी कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी पाच झोनच्या बैठका घेतल्या.

अधिकाऱ्यांची बैठकीला दांडी
नागपूर : कर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईपुढे स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर हतबल झाले आहेत. बोरकर यांनी कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी पाच झोनच्या बैठका घेतल्या.
या बैठकीचा अजेंडा काढूनही कर विभागाची जबाबदारी असलेले उपायुक्त काकडे व कर आणि कर निर्धारक शशिकांत हस्तक हे दोन्ही अधिकारी एकाही बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. अनुपस्थितीचे कारणही त्यांनी कळविले नाही. एकीकडे महापालिकेची तिजोरी रिकामी असताना दुसरीकडे कर विभागाने उत्पन्नाचे फक्त ३० टक्के लक्ष्य गाठले आहे. याची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असा प्रस्ताव बोरकर हे महापौर प्रवीण दटके यांच्याकडे सादर करणार आहेत.
बोरकर यांनी लक्ष्मीनगर, धरमपेठ, धंतोली, हनुमाननगर व नेहरूनगर या पाच झोनमधील मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेतला. या सर्व बैठकींना कर आकारणी समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख उपस्थित होते. या पाचही झोनची वसुली समाधानकारक नसल्याचे दिसून आले. रामदासपेठ, रामनगरसारख्या भागातही अत्यल्प कर वसुली झाली आहे. ३०० कोटी उत्पन्नाचे लक्ष्य असताना आॅक्टोबरपर्यंत फक्त ९४ कोटी ४८ लाख रुपयांची वसुली झाली आहे. यातही ३८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे हस्तक यांच्याकडे सुनावणीसाठी १५० च्यावर प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणांपासून मिळणाऱ्या कराची रक्कम ९ कोटी रुपयांहून अधिक आहे. वारके, जामगडे, नेरळ यांच्याकडेही काही प्रकरणे प्रलंबित आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत ही प्रकरणे निकाली काढली तर उत्पन्नात वाढ होऊ शकते. मात्र, कर विभागातील अधिकाऱ्यांचे वसुलीकडे, उत्पन्न वाढीकडे कमालीचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप बोरकर यांनी केला. प्रत्येक झोनमध्ये सरासरी ६ कर संग्राहकांची कमतरता आहे. प्रशासनाला कर वसुलीसाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे उर्वरित पाच झोनच्या आढावा बैठक रद्द करण्यात येत आहे. महापौर दटके हे नागपुरात परतल्यावर त्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेऊन कर विभागाच्या बेजबाबदारपणाचे सर्व मुद्दे मांडले जातील व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे सादर केला जाईल, असेही बोरकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)