यापुढे कुठलेही राजकीय पद स्वीकारणार नाही

By Admin | Updated: November 22, 2015 03:07 IST2015-11-22T03:07:21+5:302015-11-22T03:07:21+5:30

यापुढे आपण कुठलेही राजकीय पद घेणार नाही आणि निवडणूकही लढणार नाही, अशी घोषणा बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या मुख्य संयोजिका माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे ...

No longer will any political office be accepted | यापुढे कुठलेही राजकीय पद स्वीकारणार नाही

यापुढे कुठलेही राजकीय पद स्वीकारणार नाही

निवडणूकही लढणार नाही : सुलेखा कुंभारे यांची घोषणा
नागपूर : यापुढे आपण कुठलेही राजकीय पद घेणार नाही आणि निवडणूकही लढणार नाही, अशी घोषणा बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या मुख्य संयोजिका माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी केली. परंतु राजकारण मात्र सोडणार नाही, कार्यकर्त्यांच्या व समाजाच्या हक्कासाठी आपण लढत राहू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शनिवारी रविभवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना राजकारणासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. त्यांनी सांगितले, राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. त्यात मंत्रिपद स्वीकारण्यासाठी आपल्यालाही आॅफर आहे. परंतु मी ती आॅफर नाकारली आहे. कारण आता मी कुठलेही राजकीय पद न घेण्याचा निर्णय घेतला आहे. समाजकारण आणि धम्माच्या कामाला मी आपले उर्वरित आयुष्य घालवणार आहे. परंतु याचा अर्थ मी राजकारणातून संन्यास घेत आहे असा नाही. मी राजकारणातच राहील. कार्यकर्त्यांच्या, समाजाच्या न्यायासाठी लढत राहील.
बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपाइं पुन्हा नव्याने निर्माण होईल, याची मला खात्री आहे, त्यामुळे मी रिपाइंला एकजूट करण्याचे काम करीत राहील. यापुढे आपण राजकारणात किंगमेकरची भूमिका बजावू, असेही सुलेखा कुंभारे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: No longer will any political office be accepted