शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सदर रोडवर बसेसला ‘नो एन्ट्री’

By admin | Updated: May 21, 2016 02:58 IST

वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी प्रचंड वर्दळीचा रस्ता असलेल्या सदर रेसिडेन्सी रोडवरून २५ मे पासून दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत स्टार बस, एसटी आणि ट्रॅव्हल्सला बंदी घालण्यात आली आहे.

सहपोलीस आयुक्तांचा अध्यादेश : २५ मे पासून दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत वाहतुकीस बंदी नागपूर : वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी प्रचंड वर्दळीचा रस्ता असलेल्या सदर रेसिडेन्सी रोडवरून २५ मे पासून दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत स्टार बस, एसटी आणि ट्रॅव्हल्सला बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात सहपोलीस आयुक्त राजवर्धन यांनी शुक्रवारी अध्यादेश जारी केले आहेत. २४ जूनपर्यंत ही बंदी राहील. सदर रेसिडेन्सी रोड भागात शहरातील मुख्य बाजारपेठ असून या रोडवर ये-जा करणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते. रेसिडेन्सी रोड परिसर शहरातील जुना भाग असून या भागातील मार्ग रुंदीने लहान आहेत. त्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. दिवसेंदिवस पार्किंग समस्येत वाढ होत आहे. शहरातील मध्यभागातून स्टार बसेस, एस.टी. बसेस, मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस रेसिडेन्सी रोडकडून काटोल रोड व कोराडी रोड मार्गे पुढे जातात. रेसिडेन्स रोड परिसरात महत्त्वाची बाजारपेठ असल्याने व शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने या भागात नेहमीच वाहनांची गर्दी राहते. यातच रस्ता अतिशय छोटा आहे. अशावेळी तेथून स्टार बसेस, एस.टी. बसेस व ट्रॅव्हल्स जात असल्यास मार्ग आणखी लहान होतो. त्यामुळे इतर वाहन चालकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. किरकोळ अपघात तर नेहमीच होतात. त्यातून परिसरातील नागरिक व दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागतो यासाठी येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी व वाहन चालकांना त्रास होऊ नये म्हणून या रस्त्याने ये-जा करणाऱ्या स्टार बस, एस.टी. बसेस व ट्रॅव्हल्स बसेसना दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद राहील.असा राहणार पर्यायी मार्ग रेसिडेन्सी रोडवर बंदी घालण्यात आली असल्याने पर्यायी मार्गसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत एलआयसीकडून काटोल रोड किंवा कोराडी रोडकडे जाणाऱ्या स्टार बस, एसटी बस व ट्रॅव्हल्स या एलआयसी चौक मार्गे लिबर्टी टी पॉर्इंटकडून डावे वळण घेऊन सरळ राजभवन गेट, जुना काटोल नाका, पोलीस तलाव टी पॉर्इंटकडून उजवे वळण घेऊन सरळ पागलखाना चौकामार्गे पुढे जातील. पागलखना चौक जुना काटोल नाकाकडून एलआयसीकडे जाणारे जड वाहन जुना काटोल नाका, राजभवन, जपानी गार्डन चौकाकडून वळण घेऊन सदर पोलीस स्टेशन, मेट्रो कार्यालय, व्हीसीए चौक, लिबर्टी टी पॉर्इंट, एलआयसी चौकामार्गे पुढे जातील. उड्डाणपूल कधी होणार सदरवरील वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी स्टार बस, एसटी व ट्रॅव्हल्सला बंदी घालण्याचा निर्णय चांगला असला तरी तो यावर कायमस्वरूपी तोडगा होऊ शकत नाही. येथील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल होणार होता. तो कधी होणार असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.