शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

चॅनेलच दिसेना, सिरिअल कशा पाहायच्या? प्रेक्षक निराश, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 15:17 IST

 तीन महत्त्वाच्या चॅनेलचे प्रक्षेपणच बंद

नागपूर : सोनी, स्टार, झी या मनोरंजन क्षेत्रातील देशातील महत्त्वाच्या चॅनेलनी मासिक दरवाढीसाठी देशात कार्यक्रमांचे प्रक्षेपण बंद केल्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे. चॅनेल केव्हा सुरू होतील, यावर भाष्य करता येणार नसल्याचे केबल ऑपरेटर्सचे मत आहे. मात्र, आवडत्या कार्यक्रमांचे प्रक्षेपण बंद असल्यामुळे महिलांचे मनोरंजनाचे हक्काचे माध्यम हिरावले आहे.

मराठी आणि हिंदी कार्यक्रमांचे प्रक्षेपण बंद असल्यामुळे तीन दिवसांपासून दिवस आणि सायंकाळचा वेळ जात नाही, अशी महिलांची तक्रार आहे. कार्यक्रम बंद असल्यामुळे मालिकेतील सातत्य तुटले आहे. चॅनेल कंपन्यांनी मासिक दर किती वाढवायचे, यावर तातडीने निर्णय घेऊन कार्यक्रमांचे प्रक्षेपण तातडीने सुरू करावेत, अशी मागणी काही महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

स्टार आणि झी टीव्हीवरील मालिका नित्यनेमाने बघतो; पण तीन दिवसांपासून चॅनेलचे प्रक्षेपण बंद असल्यामुळे तीन दिवसात मालिकेत काय घडले, याची उत्सुकता लागली आहे. तसेच सोनी टीव्हीवर आवडती हिंदी मालिका बघता येत नसल्यामुळे निराश आहे.

- ममता वैरागडे, गृहिणी

दररोज स्टार, झी, सोनी, कलर्स या चॅनेलवर हिंदीच मराठी मालिका पाहतो. सायंकाळ व रात्री मालिका न बघितल्यास पुनर्प्रक्षेपण दुसऱ्या दिवशी दुपारी बघतो. तीन दिवसांपासून तीन महत्त्वाच्या चॅनेलने प्रक्षेपण बंद केले आहे. महिलांना मनोरंजनापासून वंचित करू नये.

- विद्या समर्थ, गृहिणी.

तीन दिवसांपासून टीव्ही चॅनेलचे प्रेक्षपण बंद असल्यामुळे खरोखरंच निराश आहे. कलर्स चॅनेल सुरू आहे; पण आवडीची मालिका झी मराठी चॅनेलवर बघते. त्यामुळे वारंवार या चॅनेलचे बटण दाबले जाते. चॅनेलने प्रक्षेपण लवकरच सुरू करावे.

- वर्षा बावणे, गृहिणी.

आता बस्सं झालं, झी व स्टार टीव्हीने मालिकांचे प्रसारण लवकरच सुरू करावे. महिलांचा दुपारचा वेळ मालिकांमुळे जातो. त्यांना किती दर वाढवायचे, यावर चर्चा करून ही समस्या तातडीने सोडवावी. महिलांचे मनोरंजनाचे माध्यम हिरावू नये.

- पल्लवी गणोरकर, गृहिणी.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनnagpurनागपूर