शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षासाठी नव्या चेहऱ्याचा शोध

By admin | Updated: February 15, 2016 02:57 IST

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून सुनीता गावंडे यांना नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती ...

चव्हाण यांचे नेत्यांशी ‘वन टू वन’ : मुळक,गुडधे, राऊत, भोयर चर्चेत नागपूर : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून सुनीता गावंडे यांना नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी रविवारी सकाळी रविभवनात स्थानिक नेत्यांशी ‘वन टू वन’ चर्चा करून जिल्हाध्यक्षाबाबत त्यांच्या शिफारशी जाणून घेतल्या. आजच्या हालचालींवरून मार्चपूर्वी नव्या जिल्हाध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या चर्चेत नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, युवक काँग्रेसच्या माजी रामटेक लोकसभा अध्यक्ष कुंदा राऊत, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्यासह आणखी एक-दोन नावांची शिफारस करण्यात आली. माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचेही नाव समोर आले. मात्र, इच्छुकांपैकी कुणीही आपल्याला अध्यक्ष करा, अशी विनंती प्रदेशाध्यक्षांकडे केली नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, प्रदेश काँग्रेसने तो मंजूर न करता नवा अध्यक्ष नेमेपर्यंत पदावर काम करण्याची सूचना केली होती. त्यानंतर सातत्याने नवा अध्यक्ष नेमला जाईल, अशा चर्चा रंगायच्या. मात्र, निर्णय झाला नाही. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी रविभवन येथे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. सुनील केदार, कुंदा राऊत, संजय मेश्राम आदींशी चव्हाण यांनी व्यक्तिगत चर्चा केली. चर्चेदरम्यान चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी नाव सुचविण्याची सूचना केली. त्यावर काही नेत्यांनी थेट नाव सुचविणे टाळत आपण व मुकुल वासनिक घेईल तो निर्णय मान्य असेल, अशी भूमिका घेतली. आ. सुनील केदार यांनी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचे नाव भक्कमपणे मांडले. काहींनी गावंडे यांच्या जागेवर ग्रामीणमधील कुंदा राऊत किंवा सुरेश भोयर योग्य राहतील, असे मत मांडले. राजेंद्र मुळक यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र, मुळक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नकार दिला. दरम्यान चव्हाण यांनी मोहिते यांनाही जिल्हाध्यक्ष पदाबाबत विचारणा केली. त्यांनीही सक्षम नेतृत्त्वाला संधी देण्यात यावी, अशी मागणी केली. स्थानिक नेत्यांची मते जाणून घेतल्यानंतर चव्हाण हे अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्याशी चर्चा करतील व त्यानंतरच जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाईल. मार्चपूर्वी जिल्ह्याला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)निवडणुकीसाठी घेतला आढावा या वेळी चव्हाण यांनी स्थानिक नेत्यांकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली. विधानसभा लढलेल्या सहाही उमेदवारांना आपापल्या मतदारसंघात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.