शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ना मनुष्यबळ ना मनी पॉवर पण जबाबदारी सर्वांच्या सुरक्षेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST

राजीव सिंह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील ३० लाख लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेच्या अग्निशमन विभागातील १९० अधिकारी ...

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरातील ३० लाख लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेच्या अग्निशमन विभागातील १९० अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे. म्हणजेच १५ हजार ७९० लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी अग्निशमन विभागाच्या एका कर्मचाऱ्यावर आहे. सोबतच ग्रामीण भागात आगीची घटना घडल्यास मनपाच्या अग्निशमन विभागाला गाडी पाठवावी लागते.

अग्निशमन विभागात यंत्रसामुग्री व वाहनांची कमी नाही. ती चालविण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने अग्निशमन विभागाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. या विभागाला सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्पातही नाममात्र तरतूद केली जाते.

सात वर्षात मनपा अर्थसंकल्पात अग्निशमन विभागासाठी एकूण अर्थसंकल्पाच्या १.१२ टक्के ते १.४० टक्के इतकी तरतूद करण्यात आली. तरतुदीनंतरही ही रक्कम खर्च होत नाही. मागील तीन वर्षात ३० ते ३५ टक्के रक्कम खर्च झाली. एकूणच मनुष्यबळाच्या कमतरतेसोबतच विभागाला आर्थिक तंगीचाही सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत हा विभाग लोकांचा जीव, मालमत्ता वाचविण्यात मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करता विभागाला सक्षम करण्याची गरज आहे. विभागातील ७७ टक्क्याहून अधिक पदे रिक्त आहेत.