दिल्ली मरकज संमेलनातून परतलेल्या डॉक्टरचा रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 09:32 PM2020-04-02T21:32:05+5:302020-04-02T21:33:31+5:30

दिल्ली मरकज संमेलनातून परत आलेल्या आणखी एका व्यक्तीची कोरोना विषाणू संक्रमणाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. हा व्यक्ती शहरातील एका शासकीय रुग्णालयातील डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे.

Negative report of doctor returning from Delhi Merkaj meeting | दिल्ली मरकज संमेलनातून परतलेल्या डॉक्टरचा रिपोर्ट निगेटिव्ह

दिल्ली मरकज संमेलनातून परतलेल्या डॉक्टरचा रिपोर्ट निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देआणखी चार जण आले समोर : तपासणीनंतर नऊ लोक क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्ली मरकज संमेलनातून परत आलेल्या आणखी एका व्यक्तीची कोरोना विषाणू संक्रमणाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. हा व्यक्ती शहरातील एका शासकीय रुग्णालयातील डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी लोकांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची लक्षणे आढळून आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. ३० मार्च रोजी ही घटना समोर आल्यानंतर नागपुरातही खळबळ उडाली. दिल्ली मरकज संमेलनात सहभागी होऊन नागपूरला परत आलेल्या
सातपैकी पाच जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यापैकी एकाचा रिपोर्ट अगोदरच निगेटिव्ह आलेला आहे. गुरुवारी पुन्हा एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.
नागपूर मरकजमधून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण सात लोक मरकजच्या संपर्कात राहून अधिकृतपणे दिल्ली मरकज संमेलनात सहभागी व्हायला गेले होते. यापैकी पाच लोकांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे. तीन जणांचा अहवाल अजून यायचा आहे, तर दोघांची तपासणी व्हायची आहे. हे सर्वजण ११ मार्च रोजीच नागपूरला परतले होते.

इतर चार जणही गेले होते दिल्लीला
नागपूर मरकजनुसार, मरकजच्या सात जणांशिवाय इतर चार जणसुद्धा ऑफिशियली दिल्लीच्या संमेलनासाठी गेले होते. या चौघांचीही कोरोना विषाणूसंदर्भात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल अजून यायचा आहे. नागपूर मरकजच्या सात सदस्यांपैकी तपासणी केलेल्या पाच आणि इतर चार अशा एकूण नऊ जणांना तपासणीनंतर आमदार निवासातील क्वारंटाईन कक्षात पाठवण्यात आले आहे.

चंद्रपूरमधील एका व्यक्तीचीही तपासणी
चंद्रपूर येथील इतर एका व्यक्तीचीही कोरोना विषाणू संसर्गाबाबतची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीनंतर त्यालाही आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आले आहे. नागपूर मरकजकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती ६ मार्च रोजी चंद्रपूरवरून दिल्ली मरकज संमेलनात सहभागी झाला होता. परत आल्यानंतर त्याला नागपूरला आणले गेले. मेयो रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल यायचा आहे.

Web Title: Negative report of doctor returning from Delhi Merkaj meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.