शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

‘नीरी’ने नकार दिल्याने वर्धा रोडवरील भुयारी मार्गाचा प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

वसीम कुरैशी नागपूर : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) ला आतापर्यंत वर्धा रोडवर भुयारी मार्ग बनविण्यासाठी जमिनीच्या सर्व्हेची ...

वसीम कुरैशी

नागपूर : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) ला आतापर्यंत वर्धा रोडवर भुयारी मार्ग बनविण्यासाठी जमिनीच्या सर्व्हेची परवानगी नीरीकडून मिळाली नाही. प्रस्तावित लूपसाठी एनएचएआयला नीरीची किमान अर्धा एकर जमिनीची गरज आहे, तर कारागृह, सिंचन व अन्य विभागाची एकून अडीच एकर जमिनीची आवश्यकता आहे. मात्र नीरीच्या मंजुरीसाठी प्रकल्प रखडला आहे.

मे २०१९ मध्ये भुयारी मार्गासाठी एनआचएआयने पहिल्यांदा नीरीकडे जमिनीचा सर्व्हे करण्यासाठी परवानगी मागितली होती. दोन ते तीन वेळा बैठकसुद्धा झाली होती. परंतु नीरीने सकारात्मकता दर्शविली नाही. पुन्हा आता ३१ जानेवारीला बैठक होणार आहे. यात नीरीकडून डॉ. पवन सहभागी होणार आहे.

अजनी इंटर मॉडेल स्टेशनचे (आयएमएस)चे टेंडर झाले आहे. कामाचे कंत्राट हैदराबाद येथील नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. येत्या आठवड्यापासून कंत्राटदार कंपनी आयएमएससाठी ड्रॉइंगचे काम सुरू करेल. दुसरीकडे मात्र अजनी-वन वाचविण्यासाठी प्रकल्पाला विरोध होत आहे. त्याचबरोबर अजनी रेल्वे स्टेशन ते वर्धा रोडदरम्यान भुयारी मार्गाचा प्रकल्प वेगळा आहे. याचे आतापर्यंत टेंडर निघालेले नाही.

- यासाठी आवश्यक आहे प्रोजेक्ट

अजनी रेल्वे स्टेशन ते रहाटे कॉलनी चौकदरम्यान मेट्रोल पुलासोबत नवीन रस्ता बनविण्यात आला आहे. त्यामुळे वर्धा रोडला लागून दुसरा रस्ता बनविण्याची आवश्यकता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एनएचएआयचे म्हणणे आहे, भविष्यात आयएमएसहून वर्धा रोडसाठी बससह अन्य वाहनेसुद्धा वाढणार आहे. भविष्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊन दुसरा रस्ता बनविण्यात येत आहे. अजनी रेल्वे स्टेशनचा रेल्वे ब्रीज तोडून ८ पदरी ब्रीज बनविण्यात येईल. तो सरळ कारागृहापासून वर्धा रोडला जाऊन मिळेल.

- परवानगी मिळाली तर टेंडरसुद्धा लवकर होईल

नीरीच्या जमिनीच्या सर्व्हेची मंजुरी मिळाल्यास प्रकल्पासाठी टेंडरची प्रक्रिया सुरू करता येऊ शकते. आम्हाला बघायचे आहे? की त्या जमिनीवर किती क्वॉर्टर आहे, कुठे संरक्षक भिंत आहे? व काय स्ट्रक्टर आहे?

- अभिजित जिचकार, प्रोजेक्ट डायरेक्टर, एनएचएआय

- पर्यावरणाचे संवर्धनही गरजेचे आहे

यापूर्वी मेट्रोसाठीसुद्धा नीरीची काही जमीन घेतली आहे. आता एनएचएआयचासुद्धा प्रस्ताव आहे. जमिनी प्रकल्पासाठी देण्यासंदर्भात सीएसआयआरच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जातो. प्रोजेक्टसाठी जी जागा मागितली आहे, तिथे काही क्वाॅर्टर आहे. खास औषधीची झाडे आहेत. त्याच जागेवर नीरी ग्राऊंड वॉटर मॉनिटरिंग करीत आहे. वाहतुकीची गरज लक्षात घेता रस्ते बनतात, पण पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

राकेश कुमार, संचालक, नीरी