शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा प्रचार-प्रसार ही काळाची गरज

By admin | Updated: July 7, 2014 01:02 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची गरज पूर्वीच ओळखली होती. त्यांनी देश स्वतंत्र होण्यापूर्वीच पत्नी रमाबार्इंना शिक्षित करून त्यांच्याकडून विद्यादानाचे महत्कार्य करून घेतले. विशेषत्वाने

न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन : अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे वकील परिषदेचे आयोजनश्यामकांत पाण्डेय - धारणीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची गरज पूर्वीच ओळखली होती. त्यांनी देश स्वतंत्र होण्यापूर्वीच पत्नी रमाबार्इंना शिक्षित करून त्यांच्याकडून विद्यादानाचे महत्कार्य करून घेतले. विशेषत्वाने मागासवर्गीय महिलांना घरीच शिक्षण मिळावे, यावर त्यांचा भर होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संविधान तयार करताना मूलभूत गरजांमध्ये शिक्षणाचा समावेश करण्यात आला. म्हणूनच शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिक्षणाच्या या मूलभूूत अधिकाराचा प्रचार व प्रसार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.कुसुमकोट बुजुर्ग येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे वाहीद शेख मेमोरियल इंटरनॅशनल लॉ कॉलेजमध्ये ‘शिक्षणाचा मूलभूत अधिकार’ या विषयावर आयोजित परिषदेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सेंटीनेल सॉलिसिटर्स, लंडन, वकील संघ धारणी आणि शेख अँड को सॉलीसीटर्स लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने धारणी येथे रविवारी ही परिषद पार पडली. परिषदेला न्यायमूर्ती भूूषण गवई, न्यायमूर्ती पी.जी. वराळे आणि न्यायमूर्ती झेड. ए. हक, बार काऊन्सील आॅफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष जयंत जयभाने, उपाध्यक्ष अनिल गोवरदिवे, अमरावती येथील गणेश सारडा, सॉलीसिटर आॅफ सुप्रीम कोर्ट आॅफ लंडनचे साजीद शेख उपस्थित होते. मेळघाटसारख्या दुर्गम आदिवासी भागात पहिले सेमिनार आयोजित केल्याबद्दल जयंत जयभाने यांनी आयोजकांचे कौतुक केले. शिक्षणाची खरी गरज अशाच दुर्गम व आदिवासी भागाला सर्वात जास्त आहे. कार्यक्रमात उपस्थित सर्व नामवंत वकिलांनी शिक्षण विषयक कायद्याची माहिती आपल्या वकिलांना करून द्यावी, असे जायभाने यांनी यावेळी सांगितले. न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणात अल्पसंख्यक समुदायाचाही सिंहाचा वाटा असावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या धारणी येथील उर्दू महाविद्यालयाला त्यांनी शुुभेच्छा दिल्यात. तत्पूर्वी या शैक्षणिक परिषदेच्या आयोजनाची पार्श्वभूमी विशद करताना लंडन येथील सॉलिसिटर साजीद शेख यांना गहिवरून आले. कार्यक्रमाला न्यायमूर्र्ती पी.बी. वराळे, वकील अनिल गोवरदिवे आणि सतीश सारडा यांनीही मार्गदर्शन केले. संचालन अ‍ॅड. सत्यदेव गुप्ता यांनी केले.