शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्ये आवश्यक

By admin | Updated: October 6, 2014 00:54 IST

नीतीमूल्य जीवनाचा एक भाग आहे. मग डॉक्टर असो, की इंजिनिअर. शिक्षक असो, की उद्योजक, प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवसायात त्याला फार मोठे महत्त्व आहे.

पीस फाऊंडेशन : अरुण भार्गव यांचे प्रतिपादननागपूर : नीतीमूल्य जीवनाचा एक भाग आहे. मग डॉक्टर असो, की इंजिनिअर. शिक्षक असो, की उद्योजक, प्रत्येक क्षेत्रात नीतीमूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यवसायात त्याला फार मोठे महत्त्व आहे. याशिवाय प्रगती शक्य नसल्याचे प्रतिपादन पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरुण भार्गव यांनी केले. पीस फाऊंडेशनच्यावतीने रविवारी पहिला वार्षिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ‘नीतीमूल्यांचा प्रसार आणि निरंतर शिक्षण’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ. मिराज शेख, रंधीर जव्हेरी व प्रीतेश टंक उपस्थित होते. सिव्हिल लाईन्स परिसरातील उद्योग भवनामधील व्हीआयएच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित एस. प्रभुरामन यांनी नीतीमूल्यांचे कुणासाठी पालन करायचे, स्वत:साठी की, समाजासाठी याचा सर्वप्रथम विचार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, नीतीमूल्यांचे पालन करताना, अनेक समस्या व अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रथम त्यांना तोंड देण्याची तयारी करावी लागते. राजेंद्र मिश्रा यांनी विद्यार्थ्यांमध्ये नीतीमूल्य रुजविण्याची गरज असल्याचे स्पष्ट करून, यातून समाजात चांगले नागरीक तयार होतील, असे सांगितले. मात्र सध्या शाळा-कॉलेज केवळ कारखाने बनले असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. शाळा-कॉलेजमध्ये नीतीमूल्यांचे कोणतेही शिक्षण मिळत नाही. अशा शाळा-महाविद्यालयांनी स्वत: पुढाकार घेऊन पीस फाऊंडेशनशी जुळले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. तसेच प्रीतेश टंक यांनी पीस फाऊंडेशनच्यावतीने गतवर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत, शहरातील विविध शाळांमध्ये ‘यंग चॅप्टर’ ची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी गतवर्षभरात विविध प्रसंगी समाजातील गरजूंची मदत करणाऱ्या धाडसी चिमुकल्यांना पाहुण्यांच्या हस्ते एक पुस्तक व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच एस. प्रभुरामन व राजेंद्र मिश्रा यांना स्मृतिचिन्ह देऊ न त्यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. रिता भार्गव व डॉ. वृंदा अग्रवाल यांनी केले. (प्रतिनिधी)