शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने लावले खड्ड्यांचे चित्र प्रदर्शन

By admin | Updated: August 22, 2016 02:53 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो काढून त्याचे चित्र प्रदर्शन लावले आहे.

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो काढून त्याचे चित्र प्रदर्शन लावले आहे. जाधव चौक, एसटी बस स्टॅण्ड येथे लावलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने महापालिकेत सत्तेत असलेला भाजप नागपूरकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यातही अपयशी ठरत असल्याची टीका केली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सलील देशमुख यांच्या नेतृत्वात हे अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. नागरिकांना या रस्त्यांवरून वाहने चालविणे कठीण झाले आहे. दररोज अपघात होत आहेत. गेल्या १० वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, त्यानंतरही रस्त्यांवरील खड्डे भरण्यात आलेले नाही. नागरिकांकडून खड्ड्यांबाबत ओरड झाली असता महापालिकेने एक समिती नेमून चौकशीचा फार्स केला व रस्त्यांवर खड्डे नसल्याचा अहवाल दिला, असा आरोप सलील देशमुख यांनी यावेळी केला. भाजपच्या या निष्क्रियतेविरोधात पुढील काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी महापालिकेतील माजी गटनेते वेदप्रकाश आर्य, कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, विशाल खांडेकर, अनिल अहीरकर, नूतन रेवतकर, मदुकर भावसार, रोशन भिमटे, राजीव धुमेजा, इमरान चिस्ती, विनोद हेडाऊ, स्वप्नील सूर्यवंशी, अमित करवाडे, सोहेल मिर्झा, अनिकेत गाायकवाड, विद्या सेलूकर श्रद्धा शाहू, इंदिरा मल्लिक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)