शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत राणा यांचे प्राथमिक आक्षेप फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:11 IST

नागपूर : लोकसभेच्या अमरावती मतदार संघातून विजय मिळविलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांनी ...

नागपूर : लोकसभेच्या अमरावती मतदार संघातून विजय मिळविलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्याविरुद्धच्या तीन निवडणूक याचिकांवर घेतलेले प्राथमिक आक्षेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळले. केले. संबंधित आक्षेपांमुळे वर्तमान टप्प्यावर याचिका फेटाळता येणार नाही असे स्पष्ट केले. प्रकरणावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्या विशेष न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली.

शिवसेनेचे उमेदवार आनंद अडसूळ, शिवसेना कार्यकर्ते सुनील भालेराव व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नंदकुमार अंबाडकर यांनी राणा यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. या तिघांनाही राणा यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही. त्यांनी निवडणूक याचिका दाखल करताना कायदेशीर तरतुदींची काटेकोर पूर्तता केली नाही. राणा यांच्याकडे अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र आहे. त्यामुळे त्या सदर मतदार संघातून निवडणूक लढण्यास पात्र होत्या, असे प्राथमिक आक्षेपांच्या अर्जात नमूद करण्यात आले होते; परंतु न्यायालयाने त्यांना सध्याच्या टप्प्यावर दिलासा देण्यास नकार देऊन सर्व याचिकांवर शेवटपर्यंत सुनावणी घेतली जाईल असे स्पष्ट केले. आता ५ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.

------------------

याचिकाकर्त्यांचे म्हणणे

सदर मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होता. राणा या पंजाब येथील ‘लुभाणा’ जातीच्या आहेत. त्यामुळे त्या या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी अपात्र होत्या. परंतु, त्यांनी गैरप्रकार करून ही निवडणूक लढवली. परिणामी, अनुसूचित जातीवर अन्याय झाला. ही बाब लक्षात घेता त्यांची निवडणूक रद्द करून या मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.