निसर्ग चित्रण कला प्रदर्शन आजपासून

By Admin | Updated: February 13, 2016 03:04 IST2016-02-13T03:04:17+5:302016-02-13T03:04:17+5:30

३१ जानेवारी रोजी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने निसर्ग चित्रण कला शिबिराचे आयोजन अंबाळा तलाव, रामटेक येथे करण्यात आले.

Nature Illustration Art exhibit Today | निसर्ग चित्रण कला प्रदर्शन आजपासून

निसर्ग चित्रण कला प्रदर्शन आजपासून

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचा उपक्रम : १८ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन राहणार खुले
नागपूर : ३१ जानेवारी रोजी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने निसर्ग चित्रण कला शिबिराचे आयोजन अंबाळा तलाव, रामटेक येथे करण्यात आले. या शिबिरात ८५ चित्रकारांनी सहभाग घेत निसर्ग चित्रण केले. या कार्यक्रमाचे नियोजनात्मक स्वरूप म्हणून निसर्ग चित्रण कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ९० वर्षाचे ज्येष्ठ चित्रकार अरुण मोरघडे यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन १३ ते १८ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहील.
प्रदर्शनात चित्रकार गुणवंत देवघरे आणि शिबिरात सहभागी झालेले सर्व चित्रकार उपस्थित राहणार आहेत. रामटेकच्या शिबिरात ज्येष्ठ चित्रकारांसह अनेक हौशी चित्रकारांनीही सहभाग नोंदविला. याप्रसंगी रामटेकचे सौंदर्य चित्रकारांनी कलात्मक पद्धतीने चित्रात रेखाटले आहे.
यात चित्रकार मिलिंद लिंबेकर, सदानंद चौधरी, सुभाष बाभुळकर, अब्दूल गप्फार, हेमंत मोहोड, प्रफुल्ल तायवाडे, विनोद चाचेरे, मौक्तिक काटे, अभिषेक चौरसिया, संजय मालधुरे, प्रफुल्ल डेकाटे, महेश मानकर, जयंत आष्टनकर, दिलीप भालेराव, विजय अनसिंगकर, गिरीश तोल, घनश्याम डोंगरवार, नितीन पाटील, मृणाली देशमुख यांचा सहभाग होता. या शिबिरातील कलात्मक निसर्ग चित्रणाचा लाभ सर्व रसिकांनी घ्यावा, असे आवाहन दर्डा आर्ट गॅलरीचे संयोजक चित्रकार अमित गोनाडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nature Illustration Art exhibit Today