राष्ट्रीय परिषदेत डॉ. वरभे यांना कोरोना वॉरियर्स अवॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST2021-03-08T04:07:41+5:302021-03-08T04:07:41+5:30

‘ओरल मेडिसीन अ‍ॅण्ड रेडिओलॉजी’ पुस्तकाचे प्रकाशन नागपूर : व्ही.एस.पी.एम. डेंटल कॉलेजच्या प्रा. डॉ. तपस्या कारेमोरे यांच्या ‘ओरल मेडिसीन ...

In the National Conference, Dr. Corona Warriors Award to Varbhe | राष्ट्रीय परिषदेत डॉ. वरभे यांना कोरोना वॉरियर्स अवॉर्ड

राष्ट्रीय परिषदेत डॉ. वरभे यांना कोरोना वॉरियर्स अवॉर्ड

‘ओरल मेडिसीन अ‍ॅण्ड रेडिओलॉजी’ पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : व्ही.एस.पी.एम. डेंटल कॉलेजच्या प्रा. डॉ. तपस्या कारेमोरे यांच्या ‘ओरल मेडिसीन अ‍ॅण्ड रेडिओलॉजी’ या पुस्तकाचे प्रकाशन अधिष्ठाता डॉ. उषा रडके यांच्या हस्ते झाले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. शेनॉय, विभागप्रमुख डॉ. मुक्ता मोटवानी उपस्थित होते. ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमात ओरल मेडिसीन आणि रेडिओलॉजीचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. रवी व सचिव डॉ. शालू राय हे सहभागी झाले होते. याप्रसंगी डॉ. मोटवानी, डॉ. दीपक सामदानी, डॉ. साठवणे व डॉ. रणजीत पाटील यांनी आपले विचार मांडले. पदवीपूर्व विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या पुस्तकाचे लिखाण केल्याचे डॉ. कारेमोरे यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. ध्वनी सूचक यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजानसाठी डॉ. अनुराम, डॉ. स्मृती, डॉ. अपूर्वा यांनी सहकार्य केले.

Web Title: In the National Conference, Dr. Corona Warriors Award to Varbhe