शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नाना श्यामकुळे यांचा दावा फेटाळला

By admin | Updated: February 12, 2015 02:17 IST

चंद्रपूरचे भाजपचे आ. नाना श्यामकुळे यांनी दोन प्रतिवादींविरुद्ध केलेला पाच लाखांच्या अब्रुनुकसानीचा दावा सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर श्रीमती एस. ए. हर्णे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.

नागपूर : चंद्रपूरचे भाजपचे आ. नाना श्यामकुळे यांनी दोन प्रतिवादींविरुद्ध केलेला पाच लाखांच्या अब्रुनुकसानीचा दावा सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर श्रीमती एस. ए. हर्णे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. याशिवाय त्यांच्यावर १८ हजार ३२७ रुपयांचा खर्चही बसविला. अ‍ॅड. पी.जी. निकोसे आणि डब्ल्यू.आर. मेश्राम, अशी प्रतिवादींची नावे आहेत. ८ जून २००९ रोजी श्यामकुळे यांनी हा दावा दाखल केला होता. प्रतिवादीनुसार प्रकरण असे की, श्यामकुळे हे त्रिशरण गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष असताना त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सोसायटीच्या तीन सदस्यांना दिले जाणारे तीन निवासी उपयोगाचे भूखंड खोटे शपथपत्र दाखल करून नागपूर सुधार प्रन्यासकडून स्वत:च्या नावे केले होते. त्यानंतर या तिन्ही भूखंडांवर व्यावसायिक बांधकाम केले होते. श्यामकुळे यांचा अशोकनगर येथे स्वत:चा बंगला असताना त्यांनी दाखल शपथपत्रात आपणाकडे राहण्यासाठी कोणतेही घर किंवा भूखंड नाही, असे नमूद केले होते. या सोसायटीचे वरिष्ठ सभासद या नात्याने निकोसे आणि मेश्राम यांनी १९ नोव्हेंबर २००८ रोजी जिल्हाधिकारी प्रमुख असलेल्या जिल्हा भ्रष्टाचारविरोधी समितीकडे श्यामकुळे यांची तक्रार केली होती. ही तक्रार चौकशीसाठी सहकारी संस्थांच्या उपनिबंधकाकडे पाठविण्यात आली होती. चौकशी अधिकाऱ्याने श्यामकुळे यांना ‘क्लीन चिट’ दिली होती. आपली समाजात मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली आहे, म्हणून श्यामकुळे यांनी या दोघांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला होता. वादी श्यामकुळे हे स्वत:चा अवमान झाल्याचे सिद्ध करू न शकल्याने त्यांचा दावा फेटाळण्यात आला. न्यायालयात वादीच्या वतीने अ‍ॅड. गुंडरे तर प्रतिवादींच्या वतीने अ‍ॅड. ए. के. वाघमारे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)