शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या तेजश्रीला ‘आयआयएम’मध्ये दोन सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 20:34 IST

‘आयआयएम’ सारख्या संस्थेत प्रवेश मिळविणे हीच मुळात कठीण बाब. त्यात सुवर्णपदक मिळविणे ही तर डोंगराएवढी गोष्ट. परंतु नागपूरच्या तेजश्री दाऊतपुरे हिने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता अन् अथक परिश्रमाने ‘आयआयएम’ इंदोर येथे दोन सुवर्णपदक पदरात पाडून नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

ठळक मुद्देकर्तृत्वाने गाठले यश : ‘सीएफए’परीक्षेतही मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘आयआयएम’ सारख्या संस्थेत प्रवेश मिळविणे हीच मुळात कठीण बाब. त्यात सुवर्णपदक मिळविणे ही तर डोंगराएवढी गोष्ट. परंतु नागपूरच्या तेजश्री दाऊतपुरे हिने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता अन् अथक परिश्रमाने ‘आयआयएम’ इंदोर येथे दोन सुवर्णपदक पदरात पाडून नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.तेजश्री ही नागपुरातील ‘ईएसआयएस’मधील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आणि एलआयटीमधील गणित विभागप्रमुख डॉ. शुभा दाऊतपुरे यांची कन्या आहे. तेजश्रीने नागपुरातील व्हीएनआयटी संस्थेतून २०१५ मध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने इंदोरच्या ‘आयआयएम’मध्ये प्रवेश मिळविला. आपल्या कठोर परिश्रमाने तेजश्रीने ‘आयआयएम’मध्ये दोन सुवर्णपदक प्राप्त केले आहेत. यातील एक सुवर्णपदक पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये तृतीय क्रमांकासाठी तर दुसरे मुलींमधून प्रथम येण्याबद्दल तिने पटकावले. केवळ ‘आयआयएम’मध्येच नव्हे तर जागतिक स्तरावरील ‘सीएफए’ (चार्टर्ड फायनान्शिअल अ‍ॅनालिस्ट) परीक्षेतही तिने बाजी मारली आहे. इंडिगो एअरलाईन्सचे अध्यक्ष आदित्य घोष यांच्या हस्ते इंदोर येथे ‘आयआयएम’च्या भव्य दीक्षांत समारंभात तिला हे दोन्ही सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. आपल्या यशाचे श्रेय तेजश्रीने आईवडील, शिक्षक आणि मित्रांना दिले आहे. हे भव्य यश मिळविल्यानंतर तेजश्री मुंबई येथील जे. पी. मॉर्गन या मल्टिनॅशनल कंपनीत इन्व्हेस्टमेंट बँकर या पदावर रुजु होत आहे. तेथे चार वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर स्वत:चा उद्योग सुरू करण्याची इच्छा तिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.ध्येय ठरवून वाटचाल करा‘आयआयएम’सारख्या कठीण परीक्षेत मिळविलेल्या भरघोस यशाचे रहस्य तेजश्रीला विचारले असता तिने कुठल्याही कामाप्रती आपले समर्पण महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वाटचाल करताना आधी आपले ध्येय निश्चित करावे आणि ते प्राप्त करण्यासाठी परिश्रम घ्यावेत, असा सल्ला तिने दिला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरStudentविद्यार्थी