शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात टिप्परने दोन सख्ख्या बहिणींना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:45 IST

अ‍ॅक्टिव्हाने दूध आणायला जात असलेल्या दोन तरुण बहिणींना टिप्परने चिरडले. या दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी पारडी चौक हनुमान मंदिराजवळ घडली.

ठळक मुद्देभंडारा मार्गावरील पारडीतील घटना : परिसरात तणाव पोलीस-मेट्रोविरुद्ध तीव्र संताप,  नागरिकांनी घातला गोंधळ 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅक्टिव्हाने दूध आणायला जात असलेल्या दोन तरुण बहिणींना टिप्परने चिरडले. या दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी पारडी चौक हनुमान मंदिराजवळ घडली. 

लक्ष्मी रमाशंकर शाहू (२१) व आँचल रमाशंकर शाहू (१९) रा. प्लॉट नं. १९६ जयदुर्गा शंकर किराणाजवळ बीडगाव, अशी मृत बहिणींची नावे आहेत.  मृत बहिणींचे वडील रमाशंकर शाहू यांचे घरीच किराणा दुकान आहे. दोन्ही बहिणी आईवडिलांना कामात मदत करायच्या. आचल महाविद्यालयात पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती तर लक्ष्मी हिने अकरावीनंतरच शिक्षण सोडले होते. साहू यांची मोठी मुलगी ज्योती हिचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. सर्वात लहान मुलगी चंचल अकरावीची विद्यार्थिनी आहे. शाहू आपल्या किराणा दुकानात दूध विक्रीही करतात. दुकानासाठी लागणारे दूध सर्वात लहान मुलगी चंचल ही नेहमीच भवानीनगर येथील एका दुकानातून आणायची कधी-कधी आचल व लक्ष्मीसुद्धा दूध आणायला जात असत. बुधवारी सुद्धा दोघीही दूध आणायला भवानी नगरला गेल्या होत्या.  सकाळी ७.१५ वाजता दोन्ही बहिणी दूध घेऊन अ‍ॅक्टीव्हाने घराकडे परत जात होत्या. आचल गाडी चालवित होती. दोघी पारडी बाजार चौक ओलांडून भांडेवाडी मार्गाकडे जात होत्या. त्याच वेळी भंडारा रोडच्या दिशेकडून वाळूने भरलेला टिप्पर (क्र. एम.एच./४०/ए.के.१००८) भरधाव वेगाने आला. त्याने अ‍ॅक्टीव्हाला धडक दिली. त्यावेळी पारडी चौकात चांगलीच वर्दळ होती. धडकेचा आवाज ऐकून लोकांनी टिप्पर चालकास गाडी रोखण्यासाठी आवाज दिला. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. टिप्पर चालकाने अ‍ॅक्टीव्हास्वार बहिणींना तब्बल ८० फूटापर्यंत चिरडत नेले. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक जाम केली. वाहतूक पोलीस आणि मेट्रो रेल्वेचे संथगतीने सुरू असलेल्या कामामुळेच हा अपघात झाल्याचे लोकांचे म्हणणे होते. मेट्रोच्या कामामुळे येथील वाहतूक प्रभावित होते. ऑटोचालक रस्त्यावर ठाण मांडून असतात. वाहतूक पोलीस रस्त्याच्या बाजूला उभे असतात. परंतु कुठलीही कारवाई करीत नाही. मेट्रो प्रशासन व वाहतूक पोलिसांना अनेकदा याची तक्रार सुद्धा करण्यात आली. परंतु कुठलीही कारवाई झाली नाही.  घटनेची माहिती होताच कळमना पोलीस तगड्या बंदोबस्तासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसंनी कसेबसे लोकांना शांत करीत मृतदेह मेयोला रवाना केले. या घटनेमुळे पोलिसांच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे सांगितले जाते की, वाळूने भरलेला टिप्पर ओव्हरलोड होता. तो भरधाव वेगाने जात होता. टिप्पर चालकांना जास्तीत जास्त फेºया करण्यासाठी बक्षिस दिले जाते. यामुळे ते अनियंत्रितपणे वाहने चालवतात. अवैध रेती वाहतूक शहरात नेहमीच चर्चेता विषय राहिला आहे. याला प्रशासन व पोलिसांचेही आश्रय आहे. यात दिग्गन नेतेही सहभागी आहे. त्यामुळे सर्वच आपले डोळे मिटवून घेतात. १५ दिवसांपूर्वी वळू माफियाने नंदनवन येथील नायब तहसीलदारावर हल्ला केला होता. याचा सूत्रधार अजुनही पकडला गेला नाही. यापूर्वी सुद्धा वाळू माफियाने पोलीस व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले केलेले आहे. या अपघातात जप्त टिप्परही ओव्हरलोड होता. यानंतरही तो सहजपणे शहरात दाखल झाला.  या अपघातामुळे शाहू परिवार प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. रमाशंकर यांचे कुटुंबीय मुळचे अलाहाबाद येथील राहणारे आहेत. त्यांची पत्नी अलाहाबादला गेली आहे. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. 

 पोलीस-मेट्रोचा निष्काळजीपणा या परिसरातील नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनी सांगितले की, पोलीस आणि मेट्रोच्या निष्काळजीपणामुळे येथे नेहमीच अपघात होत असतात. वाहतूक पोलीस केवळ शोभेचे बाहुले बनून उभे असतात. त्यांनी अनेकदा अपघात रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याची मागणी केली आहे. परंतु काहीह लक्ष दिले गेले नाही. अपघात झाल्यानंतर दोन-तीन दिवस अधिकारी येऊन पाहतात. त्यानंतर सर्वकाही जैसे थे होते. 

विरोध केल्यावर कारवाई   नगरसेविका जयश्री लारोकर यांचे पती योगेश्वर लारोकर यांनी सांगितले की वाहतूक व्यवस्था योग्यपणे सांभाळण्याचा सल्ला देणाऱ्या नागरिकांविरुद्ध पोलीस कारवाई करतात.  सहा महिन्यांपूर्वी अपघात करून पळून जात असलेल्या एका वाहन चालकाविरुद्ध कारवाई न केल्याबद्दल वाहतूक पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याच विरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला होता. सामाकि कार्यकर्ता म्हणून त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम असा झाला की, त्यांना १० दिवस न्यायालयीन तुरुंगात राहावे लागले होते. नागरिक आवाज उचलणार नाही तर असे अपघात होतच राहतील. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू