शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

देशात सर्वाधिक व्यक्तींवर मानवी चाचणी करणारे नागपूर दुसरे सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 07:00 IST

मानवी चाचणीत सहभागी असलेल्या देशातील १२ सेंटरमधून नागपूरच्या गिल्लूरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे सर्वाधिक मानवी चाचणी करणारे दुसरे सेंटर ठरले.

ठळक मुद्दे५५ व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोजलोकमतच्या आवाहनावर १०० कोव्हॅक्सिन वॉरियर्स तयार

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोज ३७५ व्यक्तींना देऊन पहिला टप्पा थांबविण्यात आला. मानवी चाचणीत सहभागी असलेल्या देशातील १२ सेंटरमधून नागपूरच्या गिल्लूरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे सर्वाधिक मानवी चाचणी करणारे दुसरे सेंटर ठरले. हॉस्पिटलने ५५ व्यक्तींना कोव्हॅक्सिनची लस दिली, तर पीजीआय रोहतकने ८१ व्यक्तींना लस दिली. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने सर्वात आधी या मानवी चाचणीला प्रसिद्धी दिल्याने व कोरोनाला हरविण्यासाठी 'कोव्हॅक्सिन वॉरियर्स’ होण्याचे आवाहन केल्याने १००वर वॉरियर्स पुढे आले आहेत.भारतीय औषध महानियंत्रकने (डीसीजीआय) कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीला परवानगी दिल्यानंतर भारत बायोटेक, पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटयूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही), इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या तीन संस्थाच्या देखरेखीत ही मानवी चाचणी होत आहे. सुरुवातीला एम्स दिल्ली, एम्स पाटणा, निझामुद्दीन इन्स्टिट्यूट हैदराबाद व पीजीआय रोहतक या चार संस्थांनी चाचणीला सुरुवात केली. या संस्था मिळून ५० व्यक्तींना लस दिल्यानंतर व कुणाच्याही आरोग्याचा तक्रारी नसल्याने उर्वरीत आठ संस्थांना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार नागपूरमधील गिल्लूरकर हॉस्पिटलने ६०वर व्यक्तींची तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठविले. यातील ५५ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने योग्य ठरले. २७ जुलै रोजी एका महिलेसह दोन पुरुष असे तिघांना कोविड प्रतिबंधक 'कोव्हॅक्सिन’चा पहिला डोज देऊन राज्यात मानवी चाचणीचा शुभारंभ केला. दुसऱ्या दिवशी एका विद्यार्थ्यासह तीन पुरुष अशी चौघांना लस देण्यात आली. त्यानंतर पुढील चार दिवसात उर्वरीत ४८ व्यक्तींना ही लस देण्यात आली.पहिल्या डोजचे चांगले रिझल्ट येण्याची शक्यतालसीचा पहिला डोज देण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन वॉरियर्सच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांची चमू लक्ष ठेवून आहे. सर्वांचीच प्रकृती उत्तम आहे. एका पुरुषाला काही मिनिटांसाठी थकवा आल्यासारखे जाणवले होते, परंतु थोड्यावेळातच तो बराही झाला. आता त्याला कुठलीही समस्या नाही. पहिल्या डोजचे चांगले रिझल्ट येण्याची शक्यता आहे.-डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर,संचालक, गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस