शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

नागपूर आरटीओ :प्रवासी वाहनांना लोकेशन ट्रॅकिंग बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 1:06 AM

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक प्रवासी वाहनांना ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही दोन्ही उपकरणे असल्याशिवाय वाहनांना नोंदणी किंवा तपासणी करतेवेळी योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार नाही. १ जानेवारीपासून याच्या अंमलबजावणीला तिन्ही प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे १ जानेवारीपासून अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक प्रवासी वाहनांना ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही दोन्ही उपकरणे असल्याशिवाय वाहनांना नोंदणी किंवा तपासणी करतेवेळी योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार नाही. १ जानेवारीपासून याच्या अंमलबजावणीला तिन्ही प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) सुरुवात केली आहे.केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार सर्व सार्वजनिक सेवा वाहनांना ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ आणि आपत्कालीन बटन बसविण्यास अनिवार्य करण्यात आले आहे. यामधून दुचाकी, ई-रिक्षा व तीनचाकी वाहने वगळण्यात आली आहेत. यामुळे आता १ जानेवारी टॅक्सी, कॅब, मिनी बस, बस अशा सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांची नोंदणी करताना हे दोन्ही उपकरणे वाहनामध्ये असणे आवश्यक आहे. तूर्तास योग्यता प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या जुन्या वाहनांमध्ये ही दोन्ही उपकरणे बसविण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र लवकरच या वाहनांवर सक्ती होण्याची शक्यता आहे.राज्यातील काही ‘आरटीओ’कडून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. नागपुरात अद्यापही याचे पडसाद उमटलेले नाहीत. परंतु अधिसुचना आल्यानंतर लगेचच त्याची अंमलबजावणी करण्यापुर्वी वाहतूकदारांना ही उपकरणे बसविण्यासाठी मुदत देणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. सूत्रानुसार, सध्या ही उपकरणे नसलेल्या वाहनांची नोंदणी थांबविण्यात आली आहे. या उपकरणांच्या कि मतीही वाढविण्यात आल्या आहेत. वाहतूकदारांना किमान तीन महिने वेळ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.अन्यथा वाहनाची नोंदणी नाहीसर्व सार्वजनिक सेवा वाहनांमध्ये ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ व आपत्कालीन बटन बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. १ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हे दोन्ही उपकरण नसल्यास वाहनाची नोंदणी होणार नाही. यामुळे वाहन उत्पादन, वाहन विक्रेते व वाहनधारकांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे.श्रीपाद वाडेकरप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसOrder orderआदेश केणे