शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
4
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
5
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
6
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
7
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
8
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
9
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
10
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
11
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
12
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
13
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
14
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
15
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
16
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
17
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
18
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
19
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
20
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:55 IST

उच्च शिक्षण विभागाने विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांच्या पदांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. याअंतर्गत नागपूर विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अर्चना नेरकर यांना पदावरून हटविण्यात आले आहे.

ठळक मुद्देकारणांचा खुलासा नाही : केशव तुपे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उच्च शिक्षण विभागाने विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांच्या पदांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. याअंतर्गत नागपूर विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अर्चना नेरकर यांना पदावरून हटविण्यात आले आहे. त्यांना शासकीय विज्ञान संस्थेत त्यांच्या मूळ पदावर परत पाठविण्यात आले आहे. अचानक झालेल्या या बदलांचे कारण स्पष्ट झालेले नाही.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही विभागांच्या सहसंचालकपदाची जबाबदारी केशव तुपे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या निर्णयामुळे उच्च शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामागची कारणेदेखील स्पष्ट करण्यात आलेली नाही. ही पदे भरण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. विशेष म्हणजे याअगोदर कुठल्याही अधिकाऱ्याला त्याचा कार्यकाळ संपण्याअगोदर किंवा नवीन नियुक्तीच्या अगोदर हटविण्यात आलेले नाही. नागपूर-अमरावती विभागासंदर्भात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी मिळत होत्या. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असू शकतो, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.कसे चालणार कामकाजअमरावती व नागपूर विभागात नवीन सहसंचालकांची नियुक्ती करण्याऐवजी अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आल्याच्या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. नागपूर विभागात तीन विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांत मोठ्या संख्येत संलग्नित महाविद्यालये आहेत. नागपूर विद्यापीठातच ५५० हून अधिक संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील अनुदानित महाविद्यालयांची संख्या २०० हून अधिक आहे. अधिकारी नसल्यामुळे महाविद्यालयांत शिकविणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित राहतील. महाविद्यालयांनादेखील अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

टॅग्स :Educationशिक्षणTransferबदली