नागपुरात पारा ४० पार ! मोसमातील सर्वांत उष्ण दिवसाची नोंद; पाऊस आणि उन्हाचा 'खेळ' सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:41 IST2026-03-28T14:39:51+5:302026-03-28T14:41:20+5:30

Nagpur : विदर्भात उन्हाचा तडाखा भलताच वाढला असून शुक्रवारी नागपूरकरांना या मोसमातील सर्वाधिक उष्णतेचा सामना करावा लागला. शहरात ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, हा दिवस आतापर्यंतचा सर्वात 'हॉट' ठरला आहे.

Nagpur records hottest day of the season; Rain and heat continue to clash | नागपुरात पारा ४० पार ! मोसमातील सर्वांत उष्ण दिवसाची नोंद; पाऊस आणि उन्हाचा 'खेळ' सुरूच

Nagpur records hottest day of the season; Rain and heat continue to clash

नागपूर: विदर्भात उन्हाचा तडाखा भलताच वाढला असून शुक्रवारी नागपूरकरांना या मोसमातील सर्वाधिक उष्णतेचा सामना करावा लागला. शहरात ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, हा दिवस आतापर्यंतचा सर्वात 'हॉट' ठरला आहे.

​एकीकडे हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिला असताना, दुसरीकडे मात्र नागपूरकरांना घामाच्या धारांनी अक्षरशः न्हाऊ घातले. केवळ नागपूरच नव्हे, तर विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि वाशिम या सहा जिल्ह्यांमध्येही पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

​पुढील ६-७ दिवस महत्त्वाचे

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात नागपूरसह विदर्भात विचित्र हवामान पाहायला मिळेल. कडक उन्हाच्या झळांसोबतच सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी ऊन आणि पाऊस या दोन्हीपासून बचाव करण्याची तयारी ठेवावी.

Web Title : नागपुर में पारा 40 डिग्री सेल्सियस पार: बारिश-गर्मी का 'खेल' जारी।

Web Summary : नागपुर में 40.6 डिग्री सेल्सियस के साथ सबसे गर्म दिन दर्ज किया गया, जबकि बारिश का अलर्ट जारी है। विदर्भ के कई जिलों में भी तापमान 40 डिग्री सेल्सियस से ऊपर चला गया। मौसम विभाग ने आने वाले सप्ताह में गर्मी, तेज हवाएं और बारिश की संभावना जताई है।

Web Title : Nagpur Scorches Past 40°C: Hottest Day Amidst Rain-Heat 'Game'.

Web Summary : Nagpur experienced its hottest day at 40.6°C, while a rain alert persists. Several Vidarbha districts also exceeded 40°C. The weather forecast predicts a mix of intense heat, strong winds, and potential rainfall in the coming week, requiring residents to prepare for both conditions.