शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

नागपूर  मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले : बिकट आर्थिक स्थितीचा फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:20 IST

महापालिकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मागील काही महिन्यापासून विकास कामे ठप्प आहेत. तिजोरीत पैसे नसल्याने कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचे अद्याप वेतन मिळालेले नाही. ऐन सणासुदीच्या दिवसात वेतन न मिळाल्याने कर्मचारी आर्थिक अचडणीत सापडले आहेत.

ठळक मुद्देदिवाळीपूर्वी थकबाकी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मागील काही महिन्यापासून विकास कामे ठप्प आहेत. तिजोरीत पैसे नसल्याने कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचे अद्याप वेतन मिळालेले नाही. ऐन सणासुदीच्या दिवसात वेतन न मिळाल्याने कर्मचारी आर्थिक अचडणीत सापडले आहेत.निधी नसल्याने प्रभागातील विकास कामे ठप्प आहेत. कंत्राटदारांचे थकीत बिलासाठी आंदोलन सुरु आहे. यावर तातडीने तोडगा न निघाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. महापालिकेचा दर महिन्याचा ९५ कोटींचा आवश्यक खर्च आहे. राज्य सरकारकडून जीएसटी अनुदान मिळत असले तरी या रकमेची जुळवाजुळव करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. वेतन व पेन्शन ४६ कोटी, वीज बिल ९ कोटी, कच्चे पाणी २.२५ कोटी, ओसीडब्ल्यूचा महिन्याचा खर्च ८.५० कोटी, कर्जाचा हप्ता ५ कोटी, कचरा संकलन ३.५० कोटी, तसेच परिवहन व अन्य बाबींचा यात समावेश आहे. आवश्यक खर्चाच्या तुलनेत उत्पन्न नाही. परिणामी वेतनाला विलंब होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.बिकट आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या माहापालिकेच्या विभागाला दिलेले वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करणे गरजेचे आहे. परंतु मालमत्ता विभागाच्या टॅक्स वसुलीसह थकीत एलबीटी, नगररचना, बाजार, स्थावर विभाग वसुलीत माघारला आहे. अर्थसंकल्पात या विभागापासून २०१८-१९ या वर्षात ७२७. ३० कोटींची वसुली अपेक्षित आहे. याचा विचार करता एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत ३२० कोटींची वसुली अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५२ कोटींचीच वसुली झाली. उद्दिष्टाच्या तुलनेत वसुली कमी असून सर्वच विभाग वसुलीत नापास झाले आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुक रेजा यांनी २०१८- १९ या वर्षाचा २९४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात शासकीय अनुदानाचा मोठा वाटा असला तरी महापालिकेचे मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या घटकापासूनही १००० ते १२०० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र त्या दृष्टीने महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होताना दिसत नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी