शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मेट्रो धावणारच!

By admin | Updated: July 5, 2014 02:15 IST

नागपुरात मेट्रो खरंच धावणार का? धावणार तर कधी? काही जण अशा अनेक शंकाकुशंका व्यक्त करीत आहेत.

नागपूर : नागपुरात मेट्रो खरंच धावणार का? धावणार तर कधी? काही जण अशा अनेक शंकाकुशंका व्यक्त करीत आहेत. परंतु नागपुरात नक्कीच मेट्रो धावणार आहे. त्यावर यापूर्वीच राज्याच्या कॅबिनेटने शिक्कामोर्तब करून केंद्र सरकारनेही तत्त्वत: मंजुरी दिली आहे. केंदाची पूर्ण मंजुरी प्राप्त होताच, पुढील महिनाभरात मेट्रो प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची ग्वाही नगरविकास, वने, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिली. ते शुक्रवारी नागपूर दौऱ्यावर आले असता, सायंकाळी रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सामंत पुढे म्हणाले, मेट्रो प्रकल्पावर एकूण ८ हजार ६८० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ५ टक्के नासुप्र, ५ टक्के मनपा, २० टक्के राज्य शासन व २० टक्के केंद्राकडून निधी मिळणार असून, बाकी ५० टक्के रक्कम ही कर्ज स्वरूपात उभारली जाणार असल्याचे ते म्हणाले. शुक्रवारी सामंत यांनी नागपूर सुधार प्रन्याससह महानगरपालिका, क्रीडा विभाग, सामाजिक न्याय व वन विभाग अशा विविध विभागांची स्वतंत्र आढावा बैठक घेऊन विकास कामांची माहिती जाणून घेतली. ‘रामझुला’विषयी बोलताना, या पुलाच्या निर्माणाला विलंब होत असल्याचे त्यांनी मान्य करून, पुढील सप्टेंबरपूर्वी मात्र तो कोणत्याही स्थितीत वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे त्यांनी ठोस आश्वासन दिले. शिवाय गांधीसागर तलावाला आपण प्रत्यक्ष भेट देऊन कुणाच्याही धार्मिक भावना न दुखवता, येथील इतर अतिक्रमण ताबडतोब हटविण्यासंबंधी मनपा प्रशासनाला निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. येथील सौंदर्यीकरणासाठी २२ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्राप्त झाला आहे. त्यामुळे येथील साफसफाईकडे मनपा प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. शहरात सध्या धावत असलेल्या स्टार बसेसवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त करून, या बसेसची फारच वाईट स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ४७० पैकी केवळ २५० बसेस रस्त्यांवर धावत आहेत. बाकी सर्व बंद पडल्या आहेत. त्यामुळे करारानुसार या बसेस धावत नसेल तर तो करारच रद्द करून नवीन कॉन्ट्रॅक्टरचा शोध घ्यावा, अशा मनपा प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या असल्याचे ते म्हणाले. शिवाय स्टार बसेसच्या पार्किंग समस्येविषयी बोलताना यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एक समिती स्थापन करण्यात आली असून, या बसेसच्या पार्किंगसाठी लवकरच मोरभवन येथे जागा दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)