शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर उच्च न्यायालयानेही अनुभवला शपथविधी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 21:34 IST

मुंबई येथे पार पडलेल्या हा शपथविधी सोहळा लाईव्ह पाहता यावा, यासाठी नागपूर उच्च न्यायालयाच्या सभागृहात तशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे हा लाईव्ह शपथविधी सोहळा नागपूरकरांनाही अनुभवता आला.

ठळक मुद्देअनिल किलोर, अविनाश घरोटे यांनी घेतली अतिरिक्त न्यायमूर्ती पदाची शपथ 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेल्या शिफारशीनुसार नागपूर येथील अ‍ॅड. अनिल किलोर व अ‍ॅड. अविनाश घरोटे यांच्यासह चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती प्रदान केली असून शुक्रवारी राज्याचे मुख्य न्यायाधीशांनी त्यांना शपथ दिली. मुंबई येथे पार पडलेल्या हा शपथविधी सोहळा लाईव्ह पाहता यावा, यासाठी नागपूर उच्च न्यायालयाच्या सभागृहात तशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे हा लाईव्ह शपथविधी सोहळा नागपूरकरांनाही अनुभवता आला. 

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्या. प्रदीप देशमुख, न्या. सुनील शुक्रे, न्या. झेड.ए. हक, न्या. अतुल चांदूरकर, न्या. विनय देशपांडे, न्या. स्वप्ना जोशी, न्या. रोहित देव, न्या. मनीष पितळे, न्या. मुरलीधर गिरटकर, न्या. श्रीराम मोडक, न्या. विनय जोशी, न्या. पुष्पा गणेडीवाला, सरकारी वकील अ‍ॅड. सुमंत देवपुजारी, अतिरिक्त सॉलिसटर जनरल उल्हास औरंगाबादकर, प्रबंधक प्रशासन अतुल शहा आदींसह अनेक वरिष्ठ व वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.किलोर यांचे कुटुंबीयही सहभागीन्यायामूर्ती अनिल किलोर यांचा शपथविधी पाहण्यासाठी त्यांच्या वलगाव, अमरावती येथील कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले होते. यात न्या. किलोर यांचे काका नानासाहेब किलोर, काकू रत्नाबाई आणि सुनंदाबाई, तर सावत्र भाऊ प्रभाकर, प्रवीण, योगेश, गौरव सहभागी झाले होते. हे कुटुंबीय खास पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या कुटुंबातील व्यक्ती आज न्यायमूर्तीपदावर पोहाचल्याचा अत्यानंद होत असल्याचे मत त्यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केले.नागपुरातील अनेक वकील व मान्यवर मुंबईत सहभागीन्या. अनिल किलोर व न्या. अविनाश घरोटे यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागपुरातील अनेक ज्येष्ठ वकिलांसह अनेक मान्यवर मंडळी मुंबईला गेली होती. जी मंडळी मुंबईला जाऊ शकली नाहीत ते नागपुरातील लाईव्ह सोहळ्यात सहभागी झाली होती.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर