शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आईच्या विरहात युवतीने लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 23:32 IST

आईच्या विरहाने अस्वस्थ झालेल्या एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्देअजनीतील वसंतनगरात घटना : परिसरात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आईच्या विरहाने अस्वस्थ झालेल्या एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पल्लवी जगदीश चव्हाण (वय २१) असे मृत युवतीचे नाव असून ती अजनीच्या वसंतनगरात राहत होती. पल्लवीच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर आई, भाऊ करण आणि पल्लवी असे तिघेजण कुटुंबात राहिले. त्यांची आर्थिक स्थिती फारच कमकुवत होती. अशात पल्लवीच्या आईला आजाराने ग्रासले. दोन महिन्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. वडील आणि आता आई गेल्यानंतर पल्लवी कमालीची व्यथित झाली होती. ती आईच्या विरहात अस्वस्थ राहायची. तिचा भाऊ करण याच्या साथीने जगण्यासाठी ती संघर्ष करू लागली. ती मनीषनगरातील एका चष्म्याच्या दुकानात काम करायची, तर करण बांधकामस्थळी काम करायचा. तो तिला कामावर जाण्यापूर्वी दुकानात सोडून देत होता आणि परत येताना सोबत घेऊन येत होता. आज नेहमीप्रमाणे त्याने पल्लवीला आॅप्टिकलमध्ये सोडून दिले आणि तो कामावर गेला. दुपारी २ च्या सुमारास पल्लवी घरी आली आणि तिने गळफास लावून घेतला. त्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर करणला कळविण्यात आले. करणने अजनी पोलिसांना माहिती दिली. आई-वडिलांपाठोपाठ बहीणही निघून गेल्यामुळे चव्हाण कुटुंबातील एकटा पडलेला करण मानसिकरीत्या पुरता खचला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वसंतनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर