शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Election Results 2026 : भाजपच्या विजयाचे रहस्य काय? 'मायक्रो मॅनेजमेंट'मुळे विजयी चौकार पण 'मिशन १२०' अपूर्ण

By योगेश पांडे | Updated: January 17, 2026 19:00 IST

Nagpur : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयाचा चौकार लगावत परत झेंडा फडकाविला आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून विधानसभा निवडणुकीनंतर लगेच नियोजन करण्यात आले होते.

योगेश पांडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयाचा चौकार लगावत परत झेंडा फडकाविला आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून विधानसभा निवडणुकीनंतर लगेच नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे माजी नगरसेवकांविरोधात नाराजीचा सूर असल्याने भाजपने त्यातील ५०हून माजी नगरसेवकांना धक्का देत नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखविला होता. काटेकोर नियोजन, मायक्रो मॅनेजमेंट, तळागाळातील संपर्क आणि नव्या चेहऱ्यांवर दाखविलेला विश्वास या चार सूत्रांच्या जोरावर भाजपने नागपूर महानगरपालिकेत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. मात्र काही नेत्यांच्या निकटवर्तीयांना दिलेल्या उमेदवारीमुळे जनतेत काहीसा नाराजीचा सूर निर्माण झाला व त्यामुळे 'मिशन १२०'चा आकडा गाठता आला नाही.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपने महापालिका निवडणुकीसाठी स्वतंत्र नियोजनाला सुरुवात केली होती. शहरातील प्रत्येक प्रभागाचा सखोल अभ्यास, मतदारांची सामाजिक-राजकीय स्थिती, स्थानिक प्रश्न आणि कार्यकर्त्यांची ताकद यांचा बारकाईने विचार करून रणनीती ठरविण्यात आली. यामध्ये 'मायक्रो मॅनेजमेंट' हा भाजपचा कळीचा फॉर्म्युला ठरला. प्रत्येक प्रभागात स्वतंत्र टीम, बूथनिहाय जबाबदाऱ्या आणि थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर देण्यात आला. सातत्याने तीनदा सत्तेत असल्याने 'अंटी इन्कबन्सी'चा फटका बसू शकतो, याची जाण असल्याने पक्षाने अनेक माजी नगरसेवकांच्या नावावर लाल फुली मारली होती.

तीन वेळा झाला गृहसंपर्क

भाजपच्या शंभराहून अधिक जागांमागे तळागाळातील संपर्क हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरला. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती दिली आणि स्थानिक पातळीवरील विकासकामांचा आढावा मांडला. शिवाय पदवीधर मतदारसंघातील नोंदणीचे अर्जवाटप करण्यासाठीदेखील भाजपचे कार्यकर्ते सर्वच प्रभागांत फिरले होते.

म्हणून गाठू शकले नाहीत '१२०' चा आकडा

  • भाजपच्या नेत्यांनी १२० जागांवर जिंकण्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात हे लक्ष्य गाठणे शक्य नाही, याची कल्पना नेत्यांना होती.
  • उत्तर, पश्चिम नागपुरात अनेक ठिकाणी भाजपची बूथ यंत्रणा हवी तशी मजबूत नव्हती.
  • भाजपच्या प्रचाराचा सर्व भर 3 मोठ्या नेत्यांच्या कामांवरच होता. मात्र स्थानिक उमेदवारांच्या कार्यकाळातील नाराजी कायम असल्याचे १० ते १५ जागांवरील निकालांतून दिसून आले.
  • भाजपने केवळ एकच मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरविला होता. त्यामुळे मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते भाजपपासून दूर गेली.

 

बंडोबांना केले थंडोबा; पण फटका बसलाच

या निवडणुकीत भाजपने घेतलेला आणखी एक महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय म्हणजे उमेदवार निवडीत केलेला बदल. माजी नगरसेवकांविरोधात अनेक प्रभागांत नाराजीचा सूर होता. याची दखल घेत भाजपने जवळपास ५० हून अधिक माजी नगरसेवकांना तिकीट नाकारत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. काही माजी नगरसेवकांनी उमेदवारांविरोधात छुपी मोहीम उघडली होती; परंतु पक्षनेत्यांनी ३२ जणांना निलंबित करत अशा सर्व माजी नगरसेवकांकडे बारीक लक्ष असल्याचे स्पष्ट करत कारवाईचा इशारा दिला होता. काही प्रभागांमध्ये बंडखोरांच्या वाट्याला मते गेली आणि त्याचा फटका प्रभाग १४ मधील प्रगती पाटील यांच्यासारख्या भाजप उमेदवारांना बसला.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Election: BJP's Micro-Management Wins, But 'Mission 120' Falls Short.

Web Summary : BJP secured Nagpur election victory with micro-management and new faces. Anti-incumbency and internal dissent hindered 'Mission 120'. Grassroots outreach proved crucial despite rebel impact.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६nagpurनागपूर