शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

नववधूला जसा शालू तसा नागपूरला चढला ‘जी-२०’चा साज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 00:23 IST

रंगरंगोटी, सजावट, देखावे, रोषणाईने न्हाऊन निघाले शहर

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: उत्सवप्रियतेचे लेणे लाभलेल्या नागपूरकरांना उत्सव साजरा करणे आणि त्यात धडाक्यात सहभागी होण्याची भारी हौस असते. उत्सवाच्या अनुषंगाने प्रत्येकाला आपले घर सजवावेसे वाटते. ही सजावट कायम राहावी आणि त्यात आपण मिरवावे, असा प्रत्येक नागपूरकरांचा भाव असतो. घराबाहेरही एक घर असते आणि त्यात मित्र, सहकाऱ्यांच्या रूपाने आपले वेळेला साथ देणारे नातलगही असतात. ते घर म्हणजे आपले शहर. अनेक शहरांचे मिळून राज्य आणि राज्यांचा एक देश, आपला भारत साकारला जातो. ‘जी-२० विश्व परिषदे’च्या रूपाने ही जाण आता भक्कम व्हायला लागली आहे. या परिषदेचे अध्यक्षपद भारताला लाभले आहे आणि २१ व २२ मार्च रोजी होणाऱ्या या परिषदेचे यजमानपद नागपूरने स्वीकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर असे काही सजले आहे, जणू एखाद्या नववधूने नवा कोरा शालू पांघरावा, कपाळावर टिकल्यांची माळ पसरावी, केसांना मोगऱ्याची वेणी माळावी अन् हातांवर मेंदी रचावी. नटलेले हे नागपूर प्रत्येकासाठी उत्सुकतेचा, आश्चर्याचा आणि आस्थेचा विषय ठरत आहे. जो तो हे नवखे सौंदर्य मोबाइलमध्ये कैद करतो आहे, त्याचे रिल्स बनवतो आहे आणि जगभरात गर्वाने व्हायरल करतो आहे. ‘नागपूर मेरी जान, नागपूर मेरी शान’ या लोकमतने सादर केलेल्या नागपूर एंथमला साजेशी भावना प्रत्येकाची झाली आहे.

खऱ्या अर्थाने ‘नागपूर मेरी जान...’

लोकमतने नागपूरच्या गौरावार्थ तयार केलेल्या ‘नागपूर मेरी जान, नागपूर मेरी शान’ या नागपूर एंथमचे लोकार्पण गेल्याच महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. नागपूरच्या सौंदर्याला, ऐतिहासिक वारस्याला आणि मानवीय संवेदनेला समर्पित असलेले हे गीत प्रचंड व्हायरल झाले आहे. या गीताप्रमाणेच ‘जी-२० परिषदे’च्या पार्श्वभूमीवर नागपूर सजले आहे. या परिषदेच्या निमित्ताने नागपूरचा गौरव वैश्विक स्तरावर होणार आहे. ज्या प्रमाणे वधूकडील मंडळी वऱ्हाड्यांच्या स्वागतासाठी उत्सुक असतात, त्याच प्रमाणे नागपूरकर ‘जी-२०’ सदस्यांच्या स्वागतासाठी आतुर झाले आहेत.

बस्स... हे सौंदर्य अबाधित राहावे

माझ्या घराचे सौंदर्य राखण्याची जबाबदारी माझी स्वत:ची आहे. ‘जी-२०’च्या पार्श्वभूमीवर सजलेले, नटलेले हे शहर असेच शानोशौकतमध्ये राहावे, अशी धारणा घट्ट करणे गरजेचे आहे. हा महोत्सव दोन दिवसाचा असला तरी या महोत्सवाची धार कायम राहावी. हे सौंदर्य, ही सजावट औटघटकेची ठरू नये, ही जबाबदारी जशी प्रशासनाची तशीच नागरिकांचीही आहे. नागपूरचे पोहे इंदूरला गेले आणि इंदूरचा पोहा जगभरात प्रसिद्ध झाला. उज्जैनची शेव, बिकानेरचा भुजिया प्रसिद्ध आहे. आपले हे सौंदर्य, आपला हा पाहुणचार जगभरात प्रसिद्ध करण्याची जबाबदारी आता नागपूरकरांची आहे.

नागपूरी रंगात रंगला सोशल मीडिया

‘जी-२०’च्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण आहे. याची प्रचिती सोशल मीडियावरून येते. बदललेल्या शहराचे चित्र, व्हिडीओज, रिल्स या प्लॅटफॉर्मवर जमून शेअर केले जात आहे. संपूर्ण सोशल मीडियावर सध्या नागपूर टॉप ट्रेडिंगमध्ये आहे.

प्रशासनाच्या परिश्रमाने उजळले नागपूर

‘जी-२०’ सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन नागपुरात प्रथमच होत आहे आणि त्यासाठी प्रशासनाने घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने रंगाला आली आहे. नागपूरचे बदललेले स्वरूप, त्याच परिश्रमाचे परिणाम आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी परदेशातून पाहुणे येत आहेत आणि ते विमानतळावरून थेट वर्धा महामार्गाने शहरात प्रवेश करत आहेत. त्या दृष्टीने हा सगळा कॉरिडॉर विशेषत्वाने सजविण्यात आला आहे. आता नागरिकांनी हे सौंदर्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.

रोप लाइट व नियोन लाइटचा झगमगाट

परदेशी नागरिकांच्या आगमनाच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते शहराकडे येणारे प्रत्येक मार्ग सजवले जात आहेत. विद्युत खांब, वृक्षांना रोप लाइट व नियोन लाइटने उजळले जात आहे. शहरात कुठेही घाण दिसू नये म्हणून युद्धस्तरावर सफाई अभियान राबविले जात आहे. शहरातील प्रमुख चौक व चौरस्त्यांना अशा तऱ्हेने सजविण्यात आले आहेत, जणू एखाद्या उत्सवाची, वैवाहिक सोहळ्याची तयारी केली जात आहे. जागोजागी भिंतींवर काढण्यात आलेल्या आकर्षक पेंटिंग नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. व्हीआयपी रोड, सिव्हिल लाइन्स, जीपीओ चौक, वॉकर्स स्ट्रिट, लेडिज क्लब चौक, डब्ल्यूसीएल हेडक्वार्टर रोड ज्या तऱ्हेचे सजविण्यात आले आहेत, त्यावरून ते सेल्फी पॉइंट बनले आहेत.

माता अमृतानंदमयी पोहोचल्या नागपुरात

‘जी-२०’ संमेलनाच्या अनुषंगाने सोमवारपासून सुरू होणाऱ्या ‘सी-२०’ संमेलनासाठी देश-विदेशातील प्रतिनिधी रविवारी संध्याकाळीच नागपुरात पोहोचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर या प्रतिनिधींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. ‘सी-२०’ संमेलनाची अध्यक्ष माता अमृतानंदमयी आपल्या अनुयायांसोबत पोहोचल्या आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे सीईओ सौम्या शर्मा यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर