शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

-तर ‘जलयुक्त’ होणार नागपूर!

By admin | Updated: June 6, 2017 01:43 IST

राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार उपक्रमामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी निश्चित वाढेल.

सिमेंट रोड ठरणार डोकेदुखी   पावसाचे पाणी घरात शिरणार  रस्ते झाले उंच; घरे पडली ठेंगणी  मनपाचे नियोजन फसले लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार उपक्रमामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी निश्चित वाढेल. मात्र नागपूर महापालिकेचे चुकीचे नियोजन आणि कंत्राटदारांनी सिमेंट रोडच्या कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागपूर ‘जलयुक्त’ निश्चितच होणार आहे. रस्ते उंच आणि घर ठेंगणे झाल्याने, पावसाळ्यात घरात पाणी शिरणार आहे. लोकमत चमूने सिमेंट रोडचे बांधकाम झालेल्या शहरातील सर्व प्रमुख मार्गावरील रस्तांच्या आढावा घेतला असता कामातील त्रुटीमुळे सामान्य नागरिकांना सर्वाधिक फटका बसणार असल्याचे दिसून आले. इकडे पावसाळी पाणी घरात शिरू नये म्हणून सिमेंट रोडलगत घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठान असलेल्या नागपूरकरांना घराची आणि आवारभिंतीची उंची वाढवावी लागणार असल्याने खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. दुर्गानगरातील वास्तव दक्षिण नागपुरात दुर्गानगर परिसरात सिमेंटरोडचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहेत. अजून पावसाळाही सुरू व्हायचा आहे. परंतु या रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये पावसाच्या पाण्याची भीती जाणवू लागली आहे. मानेवाडा रोड ते अयोध्यानगरला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर किमान १०० ते १५० घरे दोन्ही बाजूला आहे. या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. रस्ता बनून तयार झाला आहे. आता फुटपाथचे काम सुरू आहे. परंतु या रस्त्यामुळे अनेकांची घरे रस्त्याखाली आली आहे. त्यामुळे पावसाळ्याचे पाणी घरात शिरण्याची भीती त्यांना आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी आवश्यक चेंबर दिलेले नाही. रस्त्याचे पाणी घरात शिरणार नाही यासाठी येथील रहिवाशांना भरण टाकून रस्त्याच्या लेव्हलमध्ये अंगण आणायचे आहे. रस्त्यामुळे आगाऊचा भुर्दंड आमच्यावर बसणार असल्याची प्रतिक्रिया या रस्त्यावरील रहिवाशांची आहे. रस्त्यामुळे ५० हजारांचा खर्च आहेरस्त्याच्या बांधकामाच्या सुरुवातीलाच आमचे पाणी पुरवठ्याचे कनेक्शन तुटले. आता हा रस्ता बनलाय. रस्ता उंच आणि घर ठेंगणे असे झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरू नये त्यासाठी आता ५० हजारांचा खर्च करावा लागणार आहे. - मीनल भाके, रहिवासी, दुर्गानगर