शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेमुळे होणार नागपूरकरांची दमछाक

By admin | Updated: December 31, 2015 03:19 IST

वाचून आश्चर्य वाटेल, पण हे सत्य अहे. मेट्रो रेल्वेतून प्रवास करण्यास आतूर असलेल्या नागपूरकरांची मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे दमछाक होणार आहे.

वर्धा मार्गावरील वाहतूक वळविणार : बांधकाम सुरूआनंद शर्मा नागपूरवाचून आश्चर्य वाटेल, पण हे सत्य अहे. मेट्रो रेल्वेतून प्रवास करण्यास आतूर असलेल्या नागपूरकरांची मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे दमछाक होणार आहे. बांधकामाचा प्रारंभ नवीन वर्षात होणार असून काम वेगाने होण्यासाठी जनतेला त्रास सहन करावा लागेल. कोणताही महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार करताना अस्थायीरीत्या वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होतो. असे प्रकल्प जनतेच्या सहकार्याविना साकार होत नाहीत. मेट्रो रेल्वेच्या संदर्भातही काहीशी अशीच बाब आहे. मेट्रोत प्रवास करायचा असेल तर जनतेला वाहतूक व्यवस्थेत होणाऱ्या बदलांचा सामना करावा लागेल. सध्या मेट्रो रेल्वेचा मिहान डेपो ते वर्धा रोडवरील हॉटेल प्राईडपर्यंतचे बांधकाम वेगात सुरू आहे. वर्धा मार्ग वगळता उर्वरित मार्गावर जास्त वाहतूक जास्त नसल्यामुळे बांधकाम सहजरीत्या होत आहे. पण प्राईड हॉटेलजवळ रस्त्याच्या मध्यभागी पिल्लर उभे करण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. पायलिंग मशीनमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूचा जवळपास ९ मीटरचा परिसर ताब्यात घेण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता रुंद झाला आहे. सध्या या मार्गावर वाहतूक जाम होण्याची स्थिती नाही. पहिल्या टप्प्याचे बांधकाम वर्धा रोडवर रहाटे कॉलनी चौकापर्यंत होणार आहे. या मार्गावर वाहनांची ये-जा जास्त असते. अशा स्थितीत काम पूर्णत्वास नेण्यासाठी वाहतूक वळविणे आवश्यक आहे. त्यामुळे नागपूरकरांना त्रास होईल.जनतेचे सहकार्य हवे : गिरीमेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मत नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या वाहतूक सेलचे प्रमुख अरविंद गिरी म्हणाले. आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरकरांना त्रास होणार आहे. वाहतूक विभागाच्या परवानगीने वर्धा मार्गावर बांधकामासाठी एकूण ९ मीटर जागा ताब्यात घेतली आहे. यासाठी वाहतूक सल्लागार जयंत उके यांनी वर्धा मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ट्राफिक व्हॉल्यूम काऊंट आणि पॅसेंजर कार युनिटसंदर्भात (पीसीयू) सर्वेक्षण केले आहे. सध्या वर्धा मार्गावर वाहतूक जाम होण्याची स्थिती नाही. आवश्यकता भासल्यास रहाटे कॉलनी चौकापर्यंत मेट्रोचे काम करताना वाहतूक वळविण्यात येईल. यासाठी योग्य वेळी आवश्यक पावले उचलण्यात येतील.