नागपूरकर रमले पंडितजींच्या संतूरवादनात

By Admin | Updated: May 13, 2014 00:58 IST2014-05-13T00:58:18+5:302014-05-13T00:58:18+5:30

पहाटेचा प्रहर होता, सूर्याची किरणे हळूहळू पृथ्वीवर पडायला लागली होती, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता,

Nagapurkar in the silence of Ramle Panditji | नागपूरकर रमले पंडितजींच्या संतूरवादनात

नागपूरकर रमले पंडितजींच्या संतूरवादनात

नागपूर : पहाटेचा प्रहर होता, सूर्याची किरणे हळूहळू पृथ्वीवर पडायला लागली होती, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता, अशा वातावरणात पंडित भजन सोपारी यांनी आपल्या संतूराच्या तारा छेडल्या आणि यातून एक विलक्षण नाद प्रगट झाला. सिव्हिल लाईन परिसरात मॉर्निंंग वॉक करणार्‍यांची पावले या नादाच्या शोधात दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या मुक्तांगणमध्ये पोहोचली आणि पंडितजींच्या संतूरवादनात अक्षरश: रमली.

नागपूरकरांना पहाटे पहाटे सुमधूर संगीताचा अनुभव द.म.क्षेत्र सांस्कृतिक केंद्रामुळे मिळाला. केंद्रातर्फे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी नादब्रह्मप्रात:कालीन संगीत सभेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाच्या पहिल्याच रविवारी सुविख्यात संतूर वादक पद्मश्री पं. भजन सोपोरी यांच्या संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळी पहाट व पाडवा पहाट वगळता नागपुरात अशाप्रकारच्या प्रात:कालीन संगीत सभेचे आयोजन प्रथमच करण्यात आले होते. नियमित सांध्यकालीन संगीत सभेचा आस्वाद घेणार्‍या रसिकांना ही अनोखी भेट होती. राग अहिरीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. संतुराच्या मधुर स्वरांचा नादच इतका प्रफुल्लित करणारा होता की, रसिक शांतचित्ताने संतूराच्या नादात तल्लीन झाले होते. पंडितजींच्या प्रत्येक तोडीला रसिकांकडून भरभरून टाळ्या मिळत होत्या. राग भैरवीने त्यांनी कार्यक्रमाचे समापन केले. त्यांना तबल्यावर मिथिलेश झा व संतूरवर विथिका टिकू यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले. कार्यक्रमाला वेस्टर्न कोल फील्डचे मुख्य प्रबंधक दिनेशचंद्र गर्ग, वनामतीच्या संचालिका विनीता सिंगल, केंद्र निदेशक डॉ. पीयूष कुमार, स्मिता राव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्‍वेता सेलगावकर यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Nagapurkar in the silence of Ramle Panditji