शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकांच्या बदल्यांमध्ये दडलेय अर्थकारण!

By admin | Updated: May 12, 2014 01:06 IST

मेयो, मेडिकलमधील रुग्णसेवेचा अनुशेष दूर करण्यासाठी टप्प्याटप्प्याने परिचारिकांच्या नियुक्त करण्यात येत आहे. परंतु परिचारिकांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच ४० टक्के ...

नागपूर : मेयो, मेडिकलमधील रुग्णसेवेचा अनुशेष दूर करण्यासाठी टप्प्याटप्प्याने परिचारिकांच्या नियुक्त करण्यात येत आहे. परंतु परिचारिकांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच ४० टक्के परिचारिकांची बदली पुणे, मुंबईला करण्यात आली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय संशयाच्या भोवर्‍यात अडकले असून या बदल्यांमध्ये अर्थकारण दडल्याची चर्चा आहे. कोणतेही रु ग्णालय म्हटले की, रु ग्णांच्या सेवा-शुश्रूषेची महत्त्वपूर्ण जबाबदारी तेथील परिचारिकांवर असते. त्यात शासकीय रुग्णालय असलेल्या मेयो आणि मेडिकलमध्ये रुग्णांची संख्या पाहता परिचारिकांची संख्या तोकडी आहे. यामुळे रुग्णांची सेवा-शुश्रूषा करण्यात मोठी अडचण निर्माण होत असल्याचे नेहमीचे दृश्य आहे. भारतीय परिचर्या परिषदेच्या मानकांनुसार तीन रु ग्णांच्या मागे एक परिचारिका असे प्रमाण आवश्यक आहे. परंतु या दोन्ही रुग्णालयात ४० रुग्णांमागे एक परिचारिका असे प्रमाण आहे. यासंदर्भात नर्सेस असोसिएशनने वेळोवेळी आंदोलन केले, संप पुकारले. रुग्णालय प्रशासनानेही याची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहचविली. अखेर मागील वर्षी पुढील तीन वर्षांत राज्यात चार हजाराच्यावर पदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या वर्षी सुपर स्पेशालिटीमध्ये ५०, मेयोमध्ये ७० तर मेडिकलमध्ये १५० वर परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली. परिचारिकांना नियुक्तपत्र मिळाल्यानंतर त्या रुजू झाल्या. परंतु १५ दिवसांतच यातील ४० टक्के परिचारिकांच्या बदल्यांचे डीएमईआरचे आदेश धडकले. आठ महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडला असताना आता याच प्रकाराची पुनरावृत्ती होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नवीन नोकरीत रु जू झाल्यानंतर किमान सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी असतो. हा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बदली करता येत नाही, असा नियम आहे. या नियमाला धाब्यावर बसवून या परिचारिकांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांमागे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील वरिष्ठ अधिकारी गुंतले असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)