शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

रा. स्व. संघविरोधी विचारधारेमुळे भीम आर्मीला परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 02:54 IST

पोलिसांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघभीम आर्मी यांची विचारधारा परस्परभिन्न आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता भीम आर्मीला हेडगेवार स्मारक भवनाजवळ असलेल्या रेशीमबाग मैदानावर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली नाही, असे प्रतिज्ञापत्र कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले.भीम आर्मीचे संस्थापक अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद (रावन) यांना मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ते कायद्याची तमा न बाळगता वादग्रस्त वक्तव्ये करतात. त्यांच्यामुळे देशात विविध ठिकाणी अनेकदा हिंसक घटना घडल्या आहेत.

अशाच कृतीमुळे त्यांच्याविरुद्ध दिल्लीतील दर्यागंज पोलिसांनी २१ डिसेंबर २०१९ रोजी एफआयआर नोंदवला. २०१७ मध्ये त्यांनी राजपुतव दलित समाजामध्ये विरोध निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर हिंसक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सदर बाजार पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ५०५(१)(१), ५०५(२), १२०-ब व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(एफ) अंतर्गत एफआयआर नोंदवला होता.या कारणांमुळे नाकारली परवानगीमेळाव्याचे आयोजक भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रफु ल्ल शेंडे यांच्याविरुद्ध ११ सप्टेंबर २०१८ रोजी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही नेत्यांची वक्तव्ये समाजमन भडकवणारी असतात. त्यामुळे हा मेळावा हेडगेवार स्मारक भवनाजवळील रेशीमबाग मैदानावर झाल्यास हिंसा व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करून मेळावा आयोजित करण्याची परवानगी मिळण्यासाठी भीम आर्मीने दाखल केलेली याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली.पोलिसांच्या निर्णयाला आव्हानभीम आर्मीने त्यांच्या याचिकेद्वारे पोलिसांच्या निर्णयाचा विरोध केला आहे. राज्यघटनेनुसार शांततेच्या पद्धतीने कार्यक्रम घेण्यास मनाई करता येत नाही. त्यामुळे पोलिसांचा निर्णय रद्द करून शाततेच्या मार्गाने मेळावा घेण्याची परवानगी देण्यात यावी असे भीम आर्मीचे म्हणणे आहे. मेळाव्यासाठी २२ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.याचिकेवर न्यायमूर्ती सुनील शुक्रे व माधव जामदार यांच्यासमक्ष दीर्घ सुनावणी झाली. त्यानंतर निर्णय राखून ठेवत शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता जाहीर केला जाईल, असे न्यायालयाने सांगितले. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBhim Armyभीम आर्मी