मुत्तेमवारांनी राऊतांना विश्वासातच घेतले नाही

By Admin | Updated: May 23, 2014 01:09 IST2014-05-23T01:09:43+5:302014-05-23T01:09:43+5:30

नागपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी रोहयो मंत्री नितीन राऊत व उत्तर नागपुरातील काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले नाही. तरीही राऊत यांनी काँग्रेसचा

Muttemwar did not take Rauta into confidence | मुत्तेमवारांनी राऊतांना विश्वासातच घेतले नाही

मुत्तेमवारांनी राऊतांना विश्वासातच घेतले नाही

राऊत समर्थक सरसावले : आरोप तत्थ्यहीन

नागपूर : नागपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी रोहयो मंत्री नितीन राऊत व उत्तर नागपुरातील काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले नाही. तरीही राऊत यांनी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. त्यामुळेच इतर मतदारसंघांच्या तुलनेत उत्तर नागपुरात भाजपाला सर्वात कमी लिड मिळाली. असे असतानाही राजा द्रोणकर यांनी त्यांच्यावर आरोप केले. आरोप तथ्यहीन असल्याचे नितीन राऊत समर्थकांनी पत्रपरिषदेत सांगितले. उत्तर नागपुरातून पहिल्यांदाच भाजपाला लिड मिळाली. याचे खापर काँग्रेसचे नागपूर शहर महामंत्री राजा द्रोणकर यांनी नितीन राऊत यांच्यावर फोडले होते. राऊत यांनी आपल्या समर्थकांना विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात भडकविल्याचा आरोप त्यांनी केला होता. राऊत यांच्या संपत्तीची चौकशी करा अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यांच्या आरोपावर राऊत समर्थक चांगलेच संतप्त झाले आहे. राऊत यांच्यामुळेच भाजपाला उत्तर नागपुरात सर्वात कमी लिड मिळाली आहे. मुत्तेमवारांनी निवडणुकीत उत्तर नागपूरची जबाबदारी ज्यांच्यावर दिली होती, त्यांच्या निष्क्रियतेमुळे भाजपाला उत्तर नागपुरात १८ हजारांची लिड मिळाली. द्रोणकर हेत पक्षविरोधी काम करीत असल्याचा आरोप राऊत समर्थकांनी केला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत द्रोणकर यांनी भाजपा व बसपाला मदत केली होती. ते कधीही काँग्रेसी नव्हते. आपली ठेकेदारी वाचविण्यासाठी नेहमीच सत्ताधारी पार्टी सोबत राहत आलेले आहेत. द्रोणकर यांनी पक्षविरोधी कृती केल्यामुळे त्यांना पक्षातून निष्कासित करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. पत्रपरिषदेला नगरसेवक संदीप सहारे, सुरेश जग्यासी, सिंधुताई उईके, के. के. पांडे, संजय दुबे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Muttemwar did not take Rauta into confidence