शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
4
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
5
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
6
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
7
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
8
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
9
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
10
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
11
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
12
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
13
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
14
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
15
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
16
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
17
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
18
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
19
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
20
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
Daily Top 2Weekly Top 5

सख्ख्या भावाची हत्या

By admin | Updated: April 27, 2016 02:58 IST

जिवंतपणीच बाप आणि मुलाच्या फोटोची पूजा मांडणाऱ्या दारुड्या इसमावर त्याच्या सख्ख्या भावाने कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली.

नागपूर : जिवंतपणीच बाप आणि मुलाच्या फोटोची पूजा मांडणाऱ्या दारुड्या इसमावर त्याच्या सख्ख्या भावाने कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. मानकापूर-गोधनीतील आशीर्वादनगरात मंगळवारी रात्री ७ ते ७.३० च्या सुमारास हा थरार घडला. त्यानंतर रक्ताने माखलेल्या शरीर आणि कपड्याने आरोपी राजेश निताराम वाघाडे (वय ४५) स्वत:च मानकापूर पोलीस ठाण्यात पोहचला. संजय ऊर्फ सुरेश निताराम वाघाडे (वय ३५) असे मृताचे नाव आहे. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याची पत्नी आपल्या मुलाला घेऊन निघून गेली. तेव्हापासून त्याचे व्यसन आणखीच वाढले. त्याने एक ‘मैत्रिण’ ठेवून घेतली. त्यात दारूच्या नशेत तो उलटसुलट काम करायचा. त्यामुळे राजेश आणि सुरेशमध्ये नेहमीच वाद व्हायचे. मानकापुरात थरार नागपूर : या पार्श्वभूमीवर, दारूच्या नशेत असलेल्या सुरेशने आज सकाळपासूनच गोंधळ घालणे सुरू केले. घरासमोरची दोन झाडे तोडून टाकली. सायंकाळी स्वत:चा मुलगा (पत्नीने सोबत नेलेला) आणि जिवंत वडील या दोघांचे फोटो देवांच्या फोटोसमोर ठेवून त्याची पूजा केली. राजेशने त्याला हरकत घेतली. जिवंत मुलगा आणि वडिलाची तू कशाला पूजा मांडली, असे विचारले असता हे दोघेही आपल्यासाठी मेल्याचे सुरेश म्हणाला. त्यावरून दोन भावात जुंपली. बाचाबाचीनंतर ते हाणामारीवर उतरले. सुरेश ऐकत नसल्याने राजेशने घरातील कुऱ्हाड उचलून सुरेशच्या डोक्यावर घाव घातले. सुरेशला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपी राजेश मानकापूर ठाण्यात पोहचला. त्याच्या अंगावर, तोंडावर तसेच कपड्यावर रक्ताच्या चिरकांड्या दिसत असल्याने पोलीसही हादरले. राजेशने पोलिसांना हत्या केल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन ठाणेदार भटकर आणि मानकापूरचे पोलीस पथक त्याच्या घरी पोहचले. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)वृद्ध आईवडील, मुले आधारहीनआरोपी राजेशला छोटी मुलं आहेत. त्याची पत्नी काही दिवसांपूर्वी मृत झाली. तो बांधकामस्थळी लोहा बांधण्याचे काम करीत होता. त्याच्या मुलांचा सांभाळ वृद्ध आईवडील करीत होते. एकीकडे सुरेश मृत झाला. तर, राजेश कारागृहात जाईल, त्यामुळे आता त्याचे मुलंच नव्हे तर वृद्ध आईवडीलही आधारहीन झाले आहेत.