शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला जगविण्यासाठी आईची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

तीन महिन्यापासून सुरू आहेत उपचार : पैसे संपले, उपचार थांबले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आई-वडिलांचा म्हातारपणाचा आधार, ...

तीन महिन्यापासून सुरू आहेत उपचार : पैसे संपले, उपचार थांबले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आई-वडिलांचा म्हातारपणाचा आधार, तीन महिन्यापासून तो बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात पडून आहे. डॉक्टरांकडून त्याला जगविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण उपचारात पैशांची मर्यादा आली आहे. आई-वडिलांनी जमा केलेली जवळची पुंजी, नातेवाईकांकडून कर्जरूपाने घेतलेले पैसे आतापर्यंत उपचारावर खर्च झाले आहेत. आता जवळचे सर्व आर्थिक स्रोत आटले आहेत. त्यामुळे उपचारही थांबला आहे. पण आईची धडपड अजूनही थांबलेली नाही. मुलाला जगविण्यासाठी ती दारोदारी भटकत आहे.

तुशाल धनिराम परदेसी हा २५ वर्षीय युवक २६ ऑक्टोबर रोजी कळमना रोडवर झालेल्या अपघातात जखमी झाला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. तेव्हापासून त्याच्यावर सीए रोडवरील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत त्याचे ४ ऑपरेशन झालेले आहेत. रुग्णालयातील डॉक्टर त्याला जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यांना विश्वास आहे की तुशाल नक्कीच बरा होईल. डॉक्टरांनी दिलेल्या या दिलाशापोटी तुशालचे आईवडीलही वाटेल ती तडजोड करीत आहेत. तुशालचे वडील धनिराम हे हातमजुरीचे काम करतात. आईसुद्धा शिलाई काम करते. तुशाल हा एका फायनान्स कंपनीमध्ये नोकरी करीत होता. मुलाचा आधार झाल्याने घर सुरळीत सुरू होते. पण २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात तो जीवनमृत्यूशी संघर्ष करत आहे. या संघर्षात आई-वडिलांची जमापुंजी खर्च झाली आहे. नातेवाईक व कर्जरूपाने घेतलेला पैसाही त्याच्या उपचारात संपला आहे. आतापर्यंत तुशालच्या उपचारात १८ लाख रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. हातचा, कर्जरूपात घेतलेला पैसा आता संपला आहे. आता डॉक्टरांनी परत एक ऑपरेशन सांगितले आहे. तुशाल चालत घरी जाईल, असा विश्वास आईला दिला आहे.

आई शोभा त्याच्या उपचारासाठी पैसा गोळा करण्यासाठी भटकंती करीत आहे. कुठेतरी आशेचा दीप पेटेल, मुलगा बरा होईल, असा विश्वास तिला आहे. मुलाला जगविण्यासाठी आईची ही धडपड, तिच्या डोळ्यातून अहोरात्र पडणारे अश्रू पुसायला समाजातील सहहृदयींनी पुढे येण्याची गरज आहे.

आईच्या अपेक्षांची ओंजळ भरावी

आई शोभाची धडपड मानवी संवेदनांना पाझर फुटायला लावणारी आहे. गेल्या काही महिन्यापासून तिच्या तोंडातून शब्द कमी आणि डोळ्यातून अश्रूच तरळत आहेत. तिच्या अपेक्षांची ओंजळ भरावी, यासाठी तिला मदतीचा आधार हवा आहे. हा आधार बनण्याची इच्छा असलेल्यांनी ८९९९२४५१९३ या क्रमांकावर संपर्क करावा. अथवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वैशालीनगर शाखेतील ३३४३३६४३३६६ या खात्यातसुद्धा मदत करता येईल.