शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मोस्ट वॉन्टेड ईप्पा अखेर गजाआड

By admin | Updated: June 10, 2015 02:59 IST

मोमीनपुऱ्यासह अनेक भागात प्रचंड दहशत असलेला मोस्ट वॉन्टेड गुंड ईप्पा ऊर्फ इरफान पीर मोहम्मद याच्या मुसक्या बांधण्यात अखेर तहसील पोलिसांनी यश मिळवले.

नागपूर : मोमीनपुऱ्यासह अनेक भागात प्रचंड दहशत असलेला मोस्ट वॉन्टेड गुंड ईप्पा ऊर्फ इरफान पीर मोहम्मद याच्या मुसक्या बांधण्यात अखेर तहसील पोलिसांनी यश मिळवले. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास त्याच्या घरातूनच पोलिसांनी त्याला अटक केली. कुख्यात ईप्पावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगल, खंडणी वसुली, हाणामाऱ्या, फायरिंग असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो आणि त्याच्या टोळीची मोमीनपुरा, अन्सारनगर, डोबीनगर, गांधीबाग आदी परिसरात प्रचंड दहशत आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याने कब्रस्तान परिसरात फायरिंग करून दहशत निर्माण केली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना गवसत नव्हता.अन्सारनगर झोपडपट्टीत त्याने एक झोपडीवजा घर भाड्याने घेतले होते. दुरून ती झोपडीच वाटत असली तरी आतमधून ईप्पाने हे घर अत्यंत पॉश बनविले होते. तेथे सुखसोयीच्या सर्वच सुविधा होत्या. याच घरातून ईप्पा आपली टोळी संचलित करून गुन्हे करायचा. हे लक्षात येताच तहसीलचे ठाणेदार संतोष खांडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सोमवारी रात्री ९ वाजता ईप्पाच्या दारावर थाप दिली. आपलाच कुणी साथीदार असावा, असे समजून ईप्पाने ‘आ रे अंदर, दरवाजा खुला है’ असे म्हटले. त्याचक्षणी पोलिसांनी ईप्पाच्या घरात धडक दिली. पोलिसांना पाहून ईप्पा गोंधळला. त्याची क्रूरता लक्षात घेता सज्ज असलेल्या पोलिसांनी ईप्पावर झडप घालून त्याला जेरबंद केले. ईप्पाला अटक करण्यात आल्याची माहिती कळताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी तहसील ठाण्यात पोहचले. डीसीपी अभिनाश कुमार, गुन्हे शाखेच्या डीसीपी दीपाली मासीरकर यांनीही मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाऊन ईप्पाची चौकशी केली. मंगळवारी त्याला कोर्टात हजर करून त्याची ११ जूनपर्यंत कस्टडी मिळवण्यात आली. खतरनाक ईप्पाकडून सुपारी किलिंगसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लागू शकतो.