मोस्ट वॉन्टेड ढोलवाला गजाआड

By Admin | Updated: May 20, 2015 02:59 IST2015-05-20T02:59:28+5:302015-05-20T02:59:28+5:30

डोबीनगर, अन्सारनगर, मोमिनपुऱ्यात प्रचंड दहशत असलेल्या ईप्पा गँगचा सदस्य ...

Most Wanted Dholwalla GazaAad | मोस्ट वॉन्टेड ढोलवाला गजाआड

मोस्ट वॉन्टेड ढोलवाला गजाआड

नागपूर : डोबीनगर, अन्सारनगर, मोमिनपुऱ्यात प्रचंड दहशत असलेल्या ईप्पा गँगचा सदस्य तसेच खून आणि लुटमारीच्या अनेक गुन्ह्यातील वॉन्टेड गुन्हेगार रमजान शहा ऊर्फ ढोलवाला रऊफ शहा (वय २५, रा. मोमीनपुरा) याच्या गुन्हेशाखेच्या पथकाने अकोल्यात जाऊन मुसक्या बांधल्या. तो तीन वर्षांपासून पोलिसांना वॉन्टेड होता.
आरोपी ढोलवाला हा कुख्यात ईप्पा टोळीतील खतरनाक गुन्हेगार आहे. २०११ मध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात त्याने त्याच्या साथीदारांसह मोहम्मद आसिफ ऊर्फ गुड्डू अब्दुल जलिल याच्या डोक्यात गोळी झाडून त्याची निर्घृण हत्या केली होती. गुड्डूच्या एका मित्रावरही प्राणघातक हल्ला चढवला होता. तहसील ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या घटनेपासून आरोपी फरार होता. त्यानंतर २०१४ मध्ये स्मृती टॉकीज समोरच्या पेट्रोल पंपावर एका तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले होते. सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणी लुटमारीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरुद्ध जरीपटका, पाचपावली, लकडगंज ठाण्यातही जबरी चोरी, प्राणघातक हल्ल्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याचा ठिकठिकाणी शोध घेत होते. दरम्यान, तो माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुम (ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) येथे दडून बसल्याची माहिती गुन्हेशाखेला कळाली. त्यावरून पोलीस आयुक्त दीपाली मासिरकर, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर ढोले, पीएसआय अब्दुल वहाब, हवालदार राजेश ठाकूर, शिपायी दया, मंजितसिंग, प्रीतम यांनी कुरुम गाठले. तेथे शोधाशोध करून पोलिसांनी सोमवारी दुपारी कुख्यात ढोलवालाच्या मुसक्या बांधल्या. त्याला मंगळवारी नागपुरात आणले. (प्रतिनिधी)
राजा गौस टोळीशी संबंध
आरोपी ढोलवाला हा खतरनाक राजा गौस टोळीचाही सदस्य आहे, असे पोलीस सांगतात. राजा गौस साठी त्याने कुठेकुठे गुन्हे केले. तसेच अनेक गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची माहिती उघड होण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत.

Web Title: Most Wanted Dholwalla GazaAad