शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोजोस हुक्का पार्लरवर धाड

By admin | Updated: November 18, 2015 03:04 IST

बजाज चौकातील बहुचर्चित मोजोस हुक्का पार्लरवर सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकून विविध कंपन्याचे मद्य आणि अन्य चिजवस्तू जप्त केल्या.

विना परवाना विक्री : पोलिसांनी सील लावलेनागपूर : बजाज चौकातील बहुचर्चित मोजोस हुक्का पार्लरवर सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकून विविध कंपन्याचे मद्य आणि अन्य चिजवस्तू जप्त केल्या. परवाना नसताना या हुक्का पार्लरमध्ये आक्षेपार्ह बाबी सुरू असल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी या हुक्का पार्लरला सील लावले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारे मोजोस हुक्का पार्लर गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत होते. येथे लेटनाईट पार्ट्या आणि अन्य गैरप्रकार चालतात, अशा सारख्या तक्रारी झाल्यामुळे पोलिसांनी तेथे आकस्मिक तपासणीही केली होती. गैरप्रकार आढळल्याने पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे यांनी मोजोसचे इटिंग लायसेन्स (खाद्य परवाना) रद्द केले होते. तरीसुद्धा मोजोसमध्ये खाद्यपदार्थ आणि विविध प्रकारचे मद्य पहाटेपर्यंत बिनधास्त विकले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे यांनी सहायक आयुक्त अशोक मसराम आणि अन्य सहकाऱ्यांना घेऊन सोमवारी मध्यरात्री १ वाजता मोजोस हुक्का पार्लरवर धाड घातली. तेवढ्या रात्री येथे पोलिसांना पाच ग्राहक आढळले. त्यांचे खाणेपिणे सुरू होते. परवाना नसताना पार्लरचा मालक खाद्य पदार्थ आणि मद्यविक्री करीत असल्याचे आढळल्याने उपायुक्त बलकवडे यांनी मोजोसमधून वेगवेगळ्या ब्रॅण्डचे ३२ हजार २०० रुपये किमतीचे मद्य आणि बीअर जप्त केली.(प्रतिनिधी)हुक्का पार्लर संचालकांमध्ये खळबळ हे हुक्का पार्लर तिघांच्या भागीदारीत चालविले जाते. मात्र कागदोपत्री बलजित ऊर्फ बल्ली अरविंद ओसान (वय २८,रा. अमरजीत सोसायटी जरीपटका) आणि अक्षय अजय मेहता (वय २६, रा. बैरामजी टाऊन) या दोघांविरुद्ध दारुबंदी अधिनियमाचे कलम ६५ (क, ड) अन्वये गुन्हा दाखल केला. या कारव\ाईनंतर मोजोसला सील लावण्यात आल्याची माहिती उपायुक्त बलकवडे यांनी दिली. अंबाझरीचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गारोडे, उपनिरीक्षक पी. डी. जाधव, नायक श्रीकांत उके आणि बलजित ठाकूर यांचा या कारवाईत सहभाग होता. उपनिरीक्षक जाधव या प्रकरणी चौकशी करीत आहेत. या कारवाईमुळे हुक्का पार्लरच्या संचालकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.