महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:13 IST2020-11-28T04:13:02+5:302020-11-28T04:13:02+5:30

कळमेश्वर : रात्रीचे जेवण आटाेपल्यानंतर मुलासाेबत शतपावली करीत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलगाव येथे ...

Molestation of a woman | महिलेचा विनयभंग

महिलेचा विनयभंग

कळमेश्वर : रात्रीचे जेवण आटाेपल्यानंतर मुलासाेबत शतपावली करीत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलगाव येथे गुरुवारी (दि. २६) रात्री घडली.

महिला तिच्या मुलासाेबत घराजवळील राेडवर शतपावली करीत असताना आराेपी राजू खुशाल महाजन, रा. तेलगाव, ता.कळमेश्वर एमएच-४०/एए-६५७६ क्रमांकाच्या माेटरसायकलने आला आणि त्याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी भादंवि ३५४ (ड) अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Molestation of a woman