शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल शॉपीत औषध साठा

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

मोबाईल शॉपीत औषध साठा ठेवणाऱ्या दोघांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. फराज फारुख शेख (वय २३)

नागपूर : मोबाईल शॉपीत औषध साठा ठेवणाऱ्या दोघांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. फराज फारुख शेख (वय २३) आणि अयान अहमद इमरान अहमद (वय २२, रा. हबीबनगर) अशी आरोपींची नावे आहेत. टेका नाकाजवळ आरोपींचे रजा मोबाईल स्टोर्स आहे. तेथे आरोपींनी पॅरासिटामॉल सारखी औषधे ठेवली होती. ही माहिती मिळाल्यानंतर शहजाज ताजी खलील ताजी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दुकानात चौकशी करून ती औषधे जप्त केली. परवाना नसताना औषध खरेदी-विक्री केल्याच्या आरोपावरून फारुख आणि अयानविरुद्ध पाचपावली ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.(प्रतिनिधी)बड्या व्यापाऱ्यांकडे दुर्लक्षअन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. अनेक दुकानदार परवाना नसताना अशा प्रकारची औषधे बाळगून त्याची विक्री करतात. त्यामुळे अशा कारवायांमुळे त्यांच्यावर वचक बसणार आहे. दुसरीकडे शहरात सडकी सुपारी, बनावट सुगंधी जर्दा साठवणारे आणि विकणारे अनेक जण आहेत. एका दिवसात ही मंडळी करोडोंच्या मालाची विक्री करून सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळतात. त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी कारवाई करताना दिसत नाही. दोन आठवड्यांपूर्वी वर्धमाननगरातील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर सडकी सुपारी आढळली. पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी स्वत: या गोदामात धाड घातली. मात्र, कारवाईचा अधिकार अन्न व औषध प्रशासनाला असल्यामुळे हे प्रकरण त्यांच्याकडे सोपविण्यात आले. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी बजावलेली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, मंत्रालयात त्याची तक्रारही झाल्याची चर्चा आहे.